पाणी रे ..पाणी … जलकलशाचे पूजन
पुणे- जागतिक जलदिनानिमित्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनच्या वतीने जलदिंडीचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात जलकलशाचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कॅम्प परिसरातील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता बी.डी. यमगर, कार्यकारी अभियंता वैशाली आवटे, बारगळ, इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचे पानसे आदी उपस्थित होते.
दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचलन केले तर कार्यकारी अभियंता नंदकुमार भोई यांनी आभार मानले