अखंडित वीज आणि चांगली ग्राहक सेवा देण्यासाठी शासन कटीबद्ध ऊर्जामंत्री चन्द्रशेखर बावनकुळे

Date:

मुंबई  : राज्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीज आणि चांगली सेवा देण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असून महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी या दृष्टीने अधिक कार्यक्षमपणे काम करण्याचे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.  मुंबईत महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात शुक्रवारी (दि.27) आयोजित आढावा बैठकीत श्री. बावनकुळे बोलत होते.

राज्यातील वीज ग्राहकांना महावितरणच्यावतीने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.  त्यात अधिक पारदर्शकता आणि गतिशिलता आणण्यासाठी वेगवेगळया उपायोजना करण्यात येत असून या बाबतचा आढावा ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत घेतला.

राज्य सरकारच्यावतीने शेतकर्‍यांसाठी सौर कृषिपंप, बेरोजगार अभियंत्यांसाठी फिडर योजना, बेरोजगार अभियंत्यांना प्रायोगिक तत्वावर विविध कामे देण्याचा निर्णय इत्यादी विविध योजना राबविण्यात येत असून त्याच्या अंमलबजावणीला अधिकारी व कर्मचार्‍यांनी अधिक गती द्यावी व या योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे श्री. बावनकुळे म्हणाले.  हे करित असताना आपापल्या भागातील लोकप्रतिनीधींना विश्वासात घ्यावे असेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.  ग्राहकांना देण्यात येणारे वीजबिल वाचायला सोपे करणे, नादुरुस्त रोहित्र त्वरित दुरुस्त करण्यासाठी उपविभागीय स्तरावर अद्यावत ट्रान्सफॉर्मर भवनाची उभारणी करणे, सरासरी वीजबिल, वीजचोरीवर आळा घालणे, ग्रामीण भागातील तक्रारींचा त्वरित निपटारा करणे व शेतकर्‍यांना मोठया प्रमाणात वीजजोडणी देणे इत्यादी बाबत उपायोजना करुन त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश देऊन कामात हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांनी दिला.

या बैठकीत प्रधान सचिव (ऊर्जा) श्री. मुकेश खुल्लर, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपीन श्रीमाळी, एम.एस.ई.बी. होल्डींग कंपनीचे संचालक श्री. विश्वास पाठक, श्री. पी.व्ही. पागे, महावितरणचे संचालक सर्वश्री. अभिजीत देशपांडे, प्रभाकर शिंदे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...