केजीपासून 12 वी पर्यंत शालेय अभ्यासक्रम अॅनिमेटेड स्वरूपात शिकविणार्या ‘महाविद्या ‘ या ई -टॅब्लेट चे आणि www.mahavidya.co.in वेबसा
महाविद्या ई-टॅब बाबत अधिक माहिती देताना मोर्यानी म्हणाले, ‘महाराष्ट्रातील शहरी-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच छोटा संगणक, ‘टॅब्लेट’ स्वरूपात वापरता यावा आणि शाळेतील अभ्यासक्रम घरातही अॅनिमेटेड स्वरूपात शिकता यावा, यासाठी ‘बाबा कॉम्प्युटर्स’ने या ‘ई-टॅब’ची निर्मिती केली आहे.
महाविद्या शैक्षणिक टॅब्लेट पि.सी.मध्ये प्रत्येक इयत्तेचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक अणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीसाठी इंग्रजी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल, गणित, तर इयत्ता 11 वी व 12 वी साठी गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांत हा टॅब उपलब्ध असणार आहे. यामधील अॅनिमेशनचा उपयोग अभ्यासक्रम समजावून सांगण्यासाठी केला आहे. बहुपर्यायी प्रश्नांच्या माध्यमातून मूल्यांकन करण्याची सुविधा आहे. निकालाचे मूल्यमापन रिपोर्ट उपलब्ध आहे. चाचणी परीक्षांचे मूल्यमापन करता येणार आहे.’
तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सरस निर्मिती ‘बाबा कॉम्प्युटर्स’ ने केली असून, 7 इंच टच स्क्रीन, 1.2 जीबी प्रोसेसर, अँड्रॉईड 4.2.2 ऑपरेटिंग सिस्टिम, 512 एमबी रॅम, 4 जीबी स्टोरेज, 32 जीबी एक्स्पांडेबल, कॅमेरा 0.3 एमपी, स्पिकर, 3 ते 4 तासांचा बॅटरी बॅकअप इतक्या सुविधा या ‘टॅब’मध्ये असणार आहेत.
नाम मोर्यानी म्हणाले, ‘शिक्षकांना शिकविण्यासाठी, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी तसेच पालकांना अभ्यास घेण्यासाठी या टॅब्लेटचा उपयोग होणार आहे. केजीसाठी महाविद्या शैक्षणिक सॉफ्टवेअरसह 7,999/- असून, अकरावी व बारावीसाठी रुपये 11,999/- अशी या टॅबच्या किंमतीची रेंज आहे. एक वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.’
‘बाबा कॉम्प्युटर्स’ ही संगणक, लॅपटॉप, नोटबुक व टॅबलेटसाठी विक्री व देखभाल सेवा क्षेत्रामध्ये 30 वर्षांपासून अग्रगण्य कंपनी असून, शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रात तंत्रज्ञानाचा घरोघरी प्रसार करण्याचे ‘मिशन’ घेऊन दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनापासून टॅबनिर्मिती विक्रीची सुरुवात केली आहे. ‘बा-स्लेट’ ही टॅब्लेटची श्रेणी ‘बाबा कॉम्प्युटसर्’ने निर्माण केली असून, ‘महाविद्या टॅब’ त्याचाच भाग आहे.
महाराष्ट्र दिनापासून ‘महाविद्या’ची हेल्पलाइन देखील सुरू झाली असून, 1800 233 2266 आणि 9371107057 वर विद्यार्थी-पालकांना संपर्क साधता येणार आहे.Web- www.babacomputers.com / mahavidya आणि www.mahavidya.co.in. येथेही संपर्क साधता येईल.
——————————