पुणे :
पोलीस अधिकारयांनी विसर्जन मिरवणुकी दरम्यान विशेष दक्षता राखून कार्यक्रम सुरळीत पार पाडला त्यासाठी त्यांचा वडगाव बुद्रुक मधील श्रीकृष्ण मित्र मंडळ ट्रस्टने सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व गणेश मंडळांना स्व.सुर्यकांत झगडे स्मरणार्थ श्रीं ची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले.श्रीकृष्ण मित्र मंडळ ट्रस्टने स्व. विक्रांत कुदळे स्मरणार्थ वडगाव बु. मधील गणेश मंडळांसाठी स्वागत कक्ष उभारण्यात आला होता.
यावेळी मंडळाचे हर्षल झगडे,युवराज झगडे, गिरीष झगडे, संतोष हनमघर, रणजीतसिह जगताप, अभिषेक कवडे, किशोर बुरटे, विनायक पैलवान, मनोज वैरागकर, चिन्मय जगताप, अमित श्रीवास्तव, शुभम कुदळे व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन हर्षल झगडे यांनी केले होते.