मुंबई :
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मुंबई येथील नुतानिकृत केंद्रीय कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी दुपारी १२ वाजता पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते झाले . यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर , प्रदेश उपाध्यक्ष दशरथ राउत ,प्रदेश सचिव बाळासाहेब दोड्तले ,प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर ,पंडित घोळवे ,उज्वला हाके तसेच महादेव जानकर यांच्या मातोश्री उपस्थित होत्या
पक्षाच्या वाढीत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार महादेव जानकर ,आमदार राहुल कुल यांच्या हस्ते झाला
‘ पक्षाचे कार्य सुसूत्रीत करण्यासाठी केंद्रीय कार्यालयाचा उपयोग होणार असून यापुढे पक्ष संघटना बांधणी ,प्रशिक्षण आणि त्यातून वाढीकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे , ‘ असे महादेव जानकर यांनी सांगितले .