नवी दिल्ली-
मॅगी आरोग्याला अपायकारक आहे म्हणून मॅगीवर बंदी घातली , दारू , सिगारेट -तंबाखू , पानमसाला याचे काय ? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित झाल्यानंतर अजब सरकारने गजब खुलासा अन्न सुरक्षा व दर्जा नियंत्रण प्राधिकरणाचे मार्फत केला आहे दारू, पान मॅगी, सुपारीसारखे पदार्थ त्यावरील धोक्याच्या वैधानिक इशाऱ्यामुळे असुरक्षित मानण्याचे कारण नाही, असे अन्न सुरक्षा व दर्जा नियंत्रण प्राधिकरणाचे (एफएसएसएआय) म्हणणे आहे. शिवाय आता दारूच्या जाहिरातीही बिनदिक्कतपणे सुरु झाल्या आहेत
.तंबाखू, दारूचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक असते, हा इशारा गांभीर्याने घेण्याची गरजच नसल्याची भूमिका आता घेतली जात आहे.
सेफ्टी अॅण्ड स्टँडर्ड्स रेग्युलेशन २०१५ अंतर्गत तयार केलेल्या प्रस्तावात वैधानिक इशारा हा धोका नसल्याचे प्राधिकरणाने म्हटले असून, त्यावर लोकांची मते मागवली आहेत. मॅगीतील घटक व दर्जावरून झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एफएसएसएआयन हा ‘सुरक्षे’चा नवा प्रस्ताव तयार केला आहे. दर्जावरून, वा पदार्थातील घटकांमुळे जिवाला धोका असण्याची भीती असल्यास संबंधित उत्पादन परत मागवण्याची कायदेशीर तरतूद असते. त्यादृष्टीनेच या इशाऱ्याबाबत पुनर्स्पष्टीकरण करण्यात येणार आहे. संबंधित उत्पादन परत मागवताना उत्पादित झालेला लॉट, बॅच किंवा कोडचा विचार केला जातो. माल परत घेण्याची जबाबदारी उत्पादकाची असते, असे एफएसएसएआयने म्हटले आहे.

दारू पिवून बड्या बड्या लोकांनी केलेले अपघात – दारूने बडा -छोटा अशा सर्वांचीच उध्वस्त केलेली संसारे ; तंबाखूने राष्ट्रवादी च्या नेत्याचा घेतलेला बळी , अशा सर्व गोष्टी जगजाहीर असताना या उत्पादनांवर जर बंदी आणली जात नाही तर केवळ रामदेवबाबांना संधी मिळावी नव्या उत्पादनाची म्हणून मॅगीवर बंदी घातली गेली आहे काय ? असा सवाल आता जनतेच्या मनात तग धरू लागला आहे