मुंबई- मुंबई व गुजरातच्या अरबी समुद्रात पुढील ३६ तासांत अशोबा नावाचे धोकादायक चक्री वादळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे कर्नाटक, गोवा आणि कोकणात पुढील ४८तासांत मुसळधर पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी हे वादळ दक्षिण पश्चिम मुंबईपासून सुमारे ४७० किमी आणि ओमानच्या दक्षिण पूर्वमधील मसीरा टापूपासून ९६० किमी दूर होते अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे
हवामान खात्याने अशीही भीती व्यक्त केली आहे की, उत्तर आणि उत्तर पश्चिमच्या दिशेने हे वादळ पुढील ३६तासांत धोकादायक तुफानी वादळ येऊन धडकू शकते. अशोबा वादळाच्या भीतीने उत्तर आणि उत्तर पश्चिमच्या दिशेने समुद्रात मच्छिमारांनी जाऊ नये असा इशारा दिला आहे.
या वादळामुळे कर्नाटक, गोवा आणि कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४८ तास मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असे हवामान खात्याने म्हटले आहे. समुद्रात असणा-या मच्छिमारांना किना-यावर येण्यास सांगितले आहे. या क्षेत्रात उठणारे हे ३६ वे मोठे चक्रीवादळ असणार आहे त्यामुळे श्रीलंकेने त्याचे नामकरण ‘अशोबा’ असे केले आहे.