पुणे कॅम्प भागातील दस्तूर मेहेर रोडवरील नवनिर्माण मंडळाच्यावतीने माता वेलांगणी जन्मोत्सवानिमित भव्य मिरवणूक काढण्यात आली . या मिरवणुकीत सर्व धर्मीय सहभागी झाले होते . जरबेरा फुलांच्या सजावटीत माता वेलांगणी यांची मूर्ती ठेवण्यात आली होती . यावेळी मेहेर मोहल्ला येथून ख्रिचन महिला भगिनींनी प्राथना केली . त्यानंतर महिलानी हातामध्ये मेणबत्ती धरून माता वेलांगणी भव्य मिरवणूक काढण्यात आली . हि मिरवणूक मेहेर मोहल्ला , दस्तूर मेहेर रोड , जे जे गार्डन चौक , बुटी स्ट्रीट , सिनेगॉग स्ट्रीट , पारशी अग्यारी , साचापीर स्ट्रीट , शरबतवाला चौक येथे मिरवणुकीचा शेवट झाला . या मिरवणूक मार्गावर भक्तांनी पुष्प वाहून स्वागत केले . या उत्सवानिमित महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .
या जन्मोत्सवाचे आयोजन नवनिर्माण मंडळाचे अध्यक्ष रेबॉय फेर्नाडिस , परेश गायकवाड , उमेश फडतरे , जेम्स आऱर्नोल्ड , नाईलेज राव , स्टेनली फ्रान्सिस , रुपेश बांदोडकर , खोदु पूनावाला , अनुज रोकडे , अनिरुद्ध शिंदे , मरिना फ्रान्सिस , रिटा सत्यनेसम , वायलेट फर्नाडिस , लिडिया फ्रान्सिस , रविता रेबेला आदीनी केले होते . यावेळी माता वेलांगणीची पूजा करण्यात आली . यावेळी माता वेलांगणीची दर्शनासाठी गर्दी केली होती . यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .