चेन्नई – रजनिकांत अभिनीत ‘लिंगा’ काल (१२डिसेंबर) रिलीज झाला आहे. परंतु चेन्नईमध्ये त्यांच्या चाहत्यांनी फस्ट शोसाठी गुरुवारी रात्रीच थिएटरबाहेर गर्दी केली.अनेक ठिकाणी प्रेक्षकांनीच या चित्रपटाच्या पोस्टरची पूजा केली नारळ फोडले , उदबत्त्या लावल्या . बातम्यांनुसार, चेन्नईच्या मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिनमध्ये अॅडवान्स बुकिंग येत्या पाच दिवसांसाठी फुल हाऊसफुल आहे. अशीच परिस्थिती तामिळनाडूमधील इतर शहरांमध्येसुध्दा आहे.
तामिळनाडूमध्ये सिनेमागृह चालक , सिनेमा कंपनी यांच्याव्य्तारिक्त प्रेक्षकांनी स्वंयस्फुर्तीने रजनिकांत यांचे पोस्टर्स लावलेले होते यावरूनच रजनिकांत यांच्या चाहत्यांच्या दिवानगीचा अंदाजा लावला जाऊ शकतो. या पोस्टर्सच्या माध्यमातून चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लाखो प्रेक्षकांनी त्यांचा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी केली होती.
अनेक ठिकाणी चाहत्यांवर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. अनेक ठिकाणी प्रेक्षक तिकीट न मिळल्याने नाराज होऊन परतले तर काहींनी तोडफोड केली.