धुळे – शहरात सुरू असलेल्या चोरट्यांच्या धुमाकुळाने आज (शनिवार) कळसच गाठला. येथील गल्ली नंबर पाचमधील बडोदा बॅंकेची मुख्य शाखा फोडून एक कोटी पळवून नेल्याचे उघड होत आहे. बॅंक अधिकारी व पोलिस तपास करीत असून, नेमका आकडा किती हे चौकशीअंती गुन्हा दाखल झाल्यावर समजेल.
धुळे शहरात चोरट्यांनी हैदोस मांडला असून, काल (16 जानेवारी ) एकाच रात्रीत भरवस्तीतून सहा दुकाने फोडली. त्यानंतरही पोलिसांनी हालचाली न केल्याने चोरांचे धाडस वाढल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत धुळे शहरातील सुस्तावलेली पोलिस यंत्रणा आणि जवळजवळ बंद झालेल्या “पेट्रोलिंग‘मुळे चोरट्यांचे फावत आहे.