“पै इंटरनॅशनल लर्निंग सोल्युशन्स’तर्फे “वेदा कलोत्सव 2015′ चे पुण्यात आयोजन
पुणे :
“पै इंटरनॅशनल लर्निंग सोल्युशन्स’च्या “व्हिज्युअल ऍनिमेशन डिझाइन ऍकॅडमीतर्फे “वेदा कलोत्सव 2015′ चे आयोजन 26 ते 28 जानेवारी दरम्यान पुण्यात आझम कॅम्पस येथे करण्यात आले आहे. संस्थेचे संचालक ऋषी आचार्य, संयोजक स्वतंत्र जैन यांनी ही माहिती दिली.
या कलोत्सव अंतर्गत आंतर महाविद्यालयीन स्पर्धा होणार आहेत. त्यात बॅटल ऑफ बँडस्, लोगो डिझाइन, कॅरिकेचर कॉम्पिटिशन, क्ले मॉडेलिंग, फोटोग्राफी, फेस पेटींग, शॉर्ट फिल्म, प्रश्नमंजुषा, नृत्य-गायन स्पर्धांचा समावेश आहे. पाच लाखांची एकूण पारितोषिके दिली जाणार आहेत.
नावनोंदणीसाठी संपर्क 8888808544 अधिक माहितीसाठी kalotsav. mcesociety.org
प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) एम.सी.ई.सोसायटीच्या “आर्ट ऍण्ड पै इंटरनॅशनल’ च्या वतीने दोन दिवसीय आर्ट आणि ऍनिमेशन प्रदर्शन सर्वांसाठी खुले होणार आहे. प्रदर्शनाची वेळ दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 12.00 आणि दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 अशी असणार आहे.