सातारा – कलाकाराच्या कलेचे चीज होते, जेव्हा त्याच्या कलेला पुरस्कार स्वरुपात प्रोत्साहनाची थाप मिळते. नाशिक येथून मुंबईत आलेल्या वंदना भगत यांचा अभिनेत्री वंदना भगत यांचा अभिनेत्री वंदना भगत म्हणून प्रवास २०११ पासून सुरु झाला, नुकताच सातारा येथील प्रसिद्ध – समाज सेवा पार्टी (महाराष्ट्र) या संस्थेच्या वतीने त्यांना चित्रपटातील योगदानाबद्दल मानाचा पुरस्कार देण्यात आला.
मुंबईत २०११ मध्ये “शपथ तुला शंभुची” या लघुपटाने वंदना भगत यांचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला, पुढे “भानामती”, “आमचा विचार करा ना”, “उधो उधो ग वालुंबाई”, “स्वामी” इ चित्रपटात विशेष भूमिका साकारत राजू मेश्राम लिखित- दिग्दर्शित “झरी” चित्रपटात वंदना भगत यांची लक्षवेधी भूमिका आहे. मुंबईच्या वेगवान जीवनात चित्रपटासोबत “मधू इथे चंद्र तिथे”, “लक्ष्य”, “कमला”, “सावधान इंडिया” सारख्या मालिकांमध्ये देखील वंदना यांनी आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे.
याबाबत त्या सांगतात की,” कलाकाराला त्याच्या कामाची दखल घेतली जाते यातच सर्व काही आहे, परंतु पुरस्काराने आता माझी जबाबदारी नक्कीच वाढली आहे”…….