पुणे शहर ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने दुष्काळग्रस्तांना मदत दिलेल्या गणपती मंडळांच्या सत्कार समारंभाचे आयोजन
पुणे :
पुणे शहर ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने दुष्काळग्रस्तांना मदत दिलेल्या, तसेच गणेशोत्सवात पर्यावरणपूरक आणि नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करणार्या मंडळांचा प्रशस्तीपत्रके देऊन सत्कार करण्यात येणार आहे. खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते निवड झालेल्या मंडळांना प्रशस्तीपत्रके देण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पक्ष कार्यालय, गिरे बंगला, हिराबाग, टिळक रोड येथे होणार आहे. यावेळी चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदेश सरचिटणीस अशोक राठी यांच्या मार्गदर्शनाखालील समिती या मंडळांचे सर्वेक्षण करणार आहे. या सर्वेक्षण समितीमध्ये शंकर शिंदे, प्रशांत गांधी, अॅड.घनश्याम खलाटे, शिल्पा भोसले, डॉ. सुनीता मोरे यांचा समावेश आहे.