पुणे -महापौर-उप महापौर- स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेता अशी चार हि पदे दक्षिण पुण्याच्या प्रभागांना दिली गेल्यानंतर जणू यातील ज्येष्ठ आणि खमके असणार्या २ नेत्यांचे वर्चस्व आता कमी करण्याचे राजकीय डावपेच आखले जात असावेत असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे
मध्यंतरी एकावर पडलेली आयकर खात्याची रेड , त्यानंतर आपल्या भागात विविध आकर्षक प्रकल्प उभारण्यात अग्रेसर असलेल्या नेत्याच्या प्रभागातील एका सभागृहाबाबत आणि आता अन्य ऊकरून काढण्यात येणारे प्रकरणे पाहता या २ नेत्यांचे राजकीय वर्चस्व कमी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा अंदाज वर्तविला जातो आहे मात्र या मागे कोणी बडा नेता आहे कि स्थानिक राजकारण आहे याबाबत मात्र निश्चित माहिती अद्याप कोणी सांगू शकत नसल्याची स्थिती आहे
या सर्व चर्चेला कारण घडले ते असे … महापालिकेतील आजवरच्या उपमहापौरांचा स्नेहमेळावा घेऊन त्यांचा गौरव करण्याचा उपमहापौर आबा बागूल यांच्या पुढाकाराने घेतलेल्या कार्यक्रमाचा खर्च देण्यास पक्षनेत्यांनी नकार दिला आहे. हा कार्यक्रम महापालिकेचा नव्हताच, अशी भूमिका घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेत आजवरच्या५३ उपमहापौरांचा सन्मान करण्यासाठी गेल्या महिन्यात बालगंधर्व रंगमंदिरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी बागूल यांनी सर्व उपमहापौरांची माहिती संकलित करून कार्यक्रमात त्यांचा “लोकसखा‘ पुरस्कार देण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या खर्चाचा प्रस्ताव महापालिकेत आला तेव्हा पक्षनेत्यांच्या बैठकीत हा विषयच दप्तरी दाखल करण्यात आला. महापालिकेच्या शिष्टाचाराप्रमाणे हा कार्यक्रम झाला नसून त्याला महापालिकेचा कोणीही अधिकारी वा पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे हा कार्यक्रम महापालिकेचा नसल्यामुळे या कार्यक्रमाचा खर्च देण्यास पक्षनेत्यांच्या बैठकीत नकार दिल्याची माहिती महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी दिली. महापालिकेच्या कार्यक्रमाच्या पत्रिका पालिकेच्या प्रेसमध्येच छापल्या गेल्या पाहिजेत; तसेच या कार्यक्रमाच्या खर्चाची कोणतीही बिलेही सादर करण्यात आली नव्हती, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, हा कार्यक्रम महापालिकेचा नव्हता; तर बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाचे भाडे आकारणार का आणि महापालिकेचा लोगो वापरून या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकांची बेकायदा छपाई करण्यात आल्याने काय कारवाई करणार, या प्रश्नाला मात्र महापौरांनी बगल दिली.
दरम्यान उपमहापौर आबा बागुल यांनी याप्रकरणी असे म्हटले आहे कि , केवळ “इगो‘मुळे पक्षनेत्यांनी कार्यक्रमाचा खर्च देण्यास नकार दिला. वास्तविक, पक्षनेत्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही. ती केवळ समन्वय समिती आहे. हा विषय नियमाप्रमाणे सर्वसाधारण सभेत येणार असून तसे पत्र नगरसचिवांना दिले आहे. असे असले तरी या कार्यक्रमाचा खर्च मी देण्यास तयार आहे. हेतूपुरस्सर हा विषय फेटाळण्याचे महापौरांचे कृत्य निषेधार्ह आ
दक्षिण पुण्यातील २ नेत्यांचे वर्चस्व कमी करण्याचे प्रयत्न सुरु ?
Date: