Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

तब्बल तेरा गाण्यांनी नटलेला ‘एक तारा ‘

Date:

अजय अतुलच्या संगीताला टफ फाईट देणारे  संगीत आणि सुपरस्टार च्या दिशेला संतोष जुवेकरची घोडदौड जो चित्रपट सुरु करेल तो’ एक तारा ‘ नावाचा मराठी चित्रपट आता रसिकांचे खास संतोष जुवेकरची आकर्षण बनला आहे

कानांना तृप्त करणारं, मनाला भिडणारं, आत्म्याशी हितगुज करणारं संगीत.. संगीत ही अशी कला आहे ज्यात गाणारा आणि ऐकणारा दोघेही एकाचवेळी स्वर्गीय आनंदानुभव घेतात. गीत, संगीत आणि गायकी यांच्या सुरेल मिलाफाचा आविष्कार नवनव्या तऱ्हेने सादर केले जाऊ लागलेत. अविश्रांत केलेली कलेची साधना, खडतर प्रवासाची वाट, प्राप्त सिद्धीसाठी केलेली धडपड आणि आपलं अढळ स्थान टिकवताना होणारी होरपळ.. ही साधारण सर्वच क्षेत्रातील कलावंतांची हकीकत. अशाच एका ताऱ्याचा मंत्रमुग्ध करणारा प्रवास मोठ्या पडद्यावर येणार आहे. रईस लष्करिया निर्मित आणि अवधूत गुप्ते दिग्दर्शित महत्वाकांक्षी संगीतमय चित्रपट ‘एक तारा’ ३० जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे.

रिअलिटी शोज् मधून पुढे येणारा एक कलाकार आपल्या कलागुणांच्या होणार्या कौतुकाने कसा हरखून जातो. मिळालेली प्रसिद्धी, वैभव आणि मुळात नावलौकिकाकडे कसा पाहतो, त्याला येणारे अनुभव त्यातून स्वतःला नक्की काय मिळालं-काय गमावलं या साऱ्या प्रश्नांचा पाठपुरावा करताना दिसेल. प्रसिद्धी मिळवणं आणि टिकवणं यामधली मनाची घालमेल वाढवणारी तारेवरची कसरत करताना आपण खरंच काही मिळालं का.. याचा उहापोह ‘एक तारा’ करतो.

संतोष जुवेकर, तेजस्विनी पंडित, उर्मिला निंबाळकर, सागर करंडे, सुनील तावडे, मंगेश देसाई आणि चैतन्य चंद्रात्रे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘एक तारा’ ची कथा लिहिली आहे अवधूत गुप्ते,सचिन दरेकर यांनी तर पटकथा-संवाद सचिन दरेकर यांचे आहेत.  सादिक लष्करीया, विशाल घाग सहनिर्मित विशाल देवरुखकर यांचे सहदिग्दर्शन लाभलेल्या ‘एक तारा’चं छायांकन  अमलेंदूचौधरी यांचे असून शैलेश महाडिक कला दिग्दर्शक आहेत. संकलक इम्रान महाडिक, फैझल महाडिक तर वेशभूषा अश्विनी कोचरेकर यांनी केली आहे. ‘एक तारा’ हा संगीतप्रधान चित्रपट असल्यामुळे यातील गाण्यांची गंमतच न्यारी आहे. तब्बल १३ गाण्यांचा रसास्वाद ‘एक तारा’मधून रसिकप्रेक्षकांना घेता येणार आहे. गीतकार गुरु ठाकूर यांनी ‘एक तारा’ साठी लिहिलेली वेगवेगळ्या बाजाच्या गीतांना अवधूत गुप्तेंनी स्वरसाज चढवून न्याय दिलाय. तरुणांच्या आवडी-निवडी जपत.. बोली शब्दांची योग्य सांगड घालत, ओठी रुळणारी ‘जिंदगी हे झाड’, ‘ठोक साला’, ‘विसर तू (रॉक)’, ‘हर काश में’, ही वेड लावणारी गुरु ठाकूरची गीते तर अवधूत गुप्तेंच्या लेखणीतून ‘येड लागलं’, ‘देवा तुझ्या नावाचं येड लागलं’, ही दोन भक्तिमय गीतं खरोखरीच उत्तमरीत्या सांधली गेलीयेत. तसेच ‘वाली तू लेकरांचा’, ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘चालते नाणे’ आणि ‘अर्ध्या हळकुंडानं’ हे मॉडन भारुडही खासचं जमून आलंय. चित्रपटातील गाण्यांच्या बाजाप्रमाणे सुरेश वाडकर, स्वप्निल बांदोडकर, ज्ञानेश्वर मेश्राम, विदित पाटणकर, मुग्धा कऱ्हाडे आणि अवधूत गुप्ते या कसलेल्या गायकांकडून त्यांच्या सुरेल स्वरात गाऊन घेतली आहेत. तसेच अवधूत गुप्तेंच्या मैत्रीखातर दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि साउंड रेकॉर्डीस्ट अवधूत वाडकर यांनीही आपल्या आवाजाची कमाल दाखवली आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारा विरोधात विहिंपचे जन आक्रोश आंदोलन 

विश्व हिंदू परिषद बजरंग दल कसबा जिल्हा यांचे जिल्हाधिकारी...

निष्ठावंत हटके भक्तांमुळे गीतरामायणाला महाग्रंथासारखे पावित्र्य लाभले 

लेखक आनंद माडगूळकर : हटके म्युझिक ग्रुप 'हटके गीत...

तणावग्रस्तांच्या ९३४० कॉलमध्ये ६५ टक्के पुरुषांचे, ३ महिन्यात २४४ पैकी १७७ आत्महत्या पुरुषांच्या ..

तरुणांनो, बोलते व्हा, व्यक्त व्हा… टोकाचा निर्णय घेऊ नका! कनेक्टिंग...

हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्यासकट उखडून टाकू-उद्धव बाळासाहेब ठाकरे

घाटकोपरमध्ये मराठीची सक्ती करा मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे...