Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

झी मराठीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर मध्ये एलिझाबेथ एकादशी

Date:

 

बालपणीच्या गंमतीसोबतच मुल्यांची जपणूक करणारा, सहज सुंदर कथानक असणारा, बालकलाकारांच्या निरागस अभिनयाने सर्वांची मने जिंकणारा आणि यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा मान मिळवत सुवर्णकमळावर आपलं नाव कोरणारा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. येत्या ३१ मे रोजी सायंकाळी ७ वा. या चित्रपटाचा ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर’ झी मराठीवर होत आहे.

बालपणाचं आपल्या आयुष्यातील महत्त्व सांगताना आपण कायम ‘लहानपण दे गा देवा’ किंवा ‘रम्य ते बालपण’ सारख्या ओळी वापरतो. कारण लहानग्यांचं आपलं एक वेगळं भावविश्व असतं. त्या विश्वात स्वार्थ, हेवे दावे, ताण तणाव या गोष्टींना फारसा वाव नसतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही मोठा आनंद शोधत जगण्याचा हा काळ असतो. असंच काहीसं भावविश्व आहे पंढरपूरचा ज्ञानेश आणि त्याची बहिण मुक्ता उर्फ झेंडूचं. वडिलांचं निधन झालेलं त्यामुळे संसाराची सगळी जबाबदारी आईवर आहे. घरची परिस्थिती बेताची पण त्याचा परिणाम ना मुलांच्या शाळेवर झाला ना अभ्यासावर. यांच्या या छोट्या कुटुंबात अजून एक सदस्य आहे तो म्हणजे ज्ञानेशच्या वडिलांनी बनवलेली अनोखी सायकल – एलिझाबेथ. ज्ञानेशचे वडील वैज्ञानिक त्यामुळे विज्ञानाची एक वेगळी दृष्टी ज्ञानेशलाही मिळालीय. अभ्यासात हुशार असणा-या ज्ञानेशला किर्तनाचीही आवड आहेच पण त्यातही तो न्यूटनचे दाखले एवढ्या बेमालूमपणे देतो की किर्तनालाही वेगळा अर्थ प्राप्त होतो. अशा या छानशा कुटुंबावर एक संकट येतं. त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ही मुलं कशी मार्ग काढतात त्याची कथा म्हणजे एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट.

आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वारी करत पंढरपुरला जाणा-या वारक-यांच्या जीवनावर, त्यांच्या प्रवासावर आधारीत कथा आपण अनेक चित्रपटांतून बघितल्या होत्या परंतू ‘एलिझाबेथ एकादशी’ मधून प्रथमच त्यापलिकडची एक वेगळी गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळाली ज्याची प्रशंसा सर्वच स्तरातून झाली. संतांच्या अभंगवाणीसोबतच शास्त्रज्ञांच्या शोधांच्या नियमांचे दाखले देत अध्यात्म आणि विज्ञान याची निराळी सांगड या चित्रपटातून घालण्यात आली. परेश मोकाशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. यात काम करणारी मुलं म्हणजे झेंडू, ज्ञानेश, गण्या त्यांचा निरागस अभिनय, त्यांचे संवाद तुफान लोकप्रिय झाले होते. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) या चित्रपटाने उत्कृष्ट मराठी चित्रपटासाठीचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा ‘संत तुकाराम पुरस्कार’ पटकावला होता. याशिवाय अनेक मानाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवरही या चित्रपटानं आपलं नाव कोरलं. आपल्या देशासहित परदेशातही मराठीचा झेंडा उंचावणा-या आणि बालपणाशी पुन्हा आपलं नातं जोडणा-या या ‘एलिझाबेथ एकादशी’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या ३१ मे रोजी सायंकाळी ७ वा. झी मराठीवर होत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खुनातील आरोपी उद्धव उर्फ उद्ध्या कांबळेला सहकारनगर पोलिसांकडून अटक

पुणे – २०१६ साली झालेल्या खुनाच्या प्रकरणात आरोपी असलेल्या...

ऊसतोड कामगार कायद्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करा :उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. १५ जुलै २०२५ : ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र कायदा...