जिंकले … देवेंद्र फडणवीस : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

Date:

मुंबई- स्वतंत्र विदर्भाचे कट्टर समर्थक असलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहे. आज, मंगळवारी विधानभवनात पार पडलेल्या भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली. केंद्रीय निरीक्षक म्हणून मुंबईत आलेले गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे प्रभारी जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सूचना केली. तर माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि आमदार पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिले अशी माहिती नड्डा यांनी पत्रकारांनी दिली. उपस्थित सर्व आमदारांनी या निवडीवर होकार दर्शवला . या प्रक्रियेनंतर बैठकीत राजनाथ सिंह यांनी फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. आज, संध्याकाळी सव्वा सहा वाजता राज्यपाल विद्यासागर राव यांना भेटून सरकार स्थापन करण्यासाठी दावा करणार असल्याचं तावडे यांनी सांगितले.’केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही घोषणा अखेर खरी ठरली आहे. देवेंद्र फडणवीस हे कमी वयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे दुसरे नेते असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे वयाच्या 37व्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री झाले होते.
देवेंद्र फडणवीस 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूर जिल्ह्यात झाला. देवेंद्र फडणवीस यांनी एल.एल.बी., बिझनेस मॅनेजमेंट व डी.एस.ई तसंच बर्लिनमधून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट इत्यादी विषयात पदविका प्राप्त केल्या आहेत.
फडणवीस यांनी नव्वदच्या दशकात राजकीय कारकि‍र्दीला प्रारंभ केला. राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी काम केले आहे. १९९२ आणि १९९७ साली ते दोन वेळा नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. लहान वयात नागपूरचे महापौर पद भूषविले, सर्वात कमी वयाचे ते देशातील दुसरे महापौर होते.
विधानसभेसाठी १९९९ मध्ये नागपुरातून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली व ते आमदार झाले. सलग १३ वर्षे विधानसभेत असताना त्यांनी अंदाज समिती, गृह व नगरविकास खात्यांची स्थायी समिती, कायदा समिती ,सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी क्षेत्रात काम केले आहे. विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
आली दिवाळी …
फडणविसांनी दिली ५ जॅकेट ची ऑर्डर
आता खरी फडणवीसांची दिवाळी सुरु होत असून या आनंदाप्रित्यर्थ त्यांनी तडकाफडकी पाच जॅकेट्स आणि शर्ट व ट्राऊझर्सची ऑर्डर दिली आहेनागपूरच्या सीताबर्डीमधील गोविंदा कलेक्शन येथे फडणवीस यांचे कपडे नेहमी शिवले जातात. मात्र आता त्यांनी तडकाफडकी पाच जॅकेट्स आणि शर्ट व ट्राऊझर्सची ऑर्डर दिली आहे. गोविंदा कलेक्शनचे बिट्टू मेहाडिया यांनी सांगितले, की गेली 20 वर्षे फडणवीस त्यांच्याकडूनच कपडे तयार करुन घेत आहेत. आता त्यांनी पाच जॅकेट्स आणि शर्ट व ट्राऊझर्सची ऑर्डर दिली आहे. त्यांचे हे सर्व कपडे मेहाडिया यांनी तयार करुन ठेवले आहेत. हे ड्रेस फडणवीसांचे मित्र मुंबईला घेऊन जाणार आहेत. यातीलच एखादा ड्रेस परिधान करुन फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी जॅकेट परिधान करण्यास सुरुवात केली आहे. त्याआधी शर्ट आणि ट्राऊझर्स असाच त्यांचा पेहेराव होता. देवेंद्र यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्या सल्ल्याने जॅकेट वापरण्यास सुरुवात केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. त्यांना रिंकल फ्री कपडे जास्त आवडतात, असे मेहाडिया यांचे म्हणणे आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जेके टायर-कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया कार रॅलीच्या नवव्या आवृत्तीला हिरवा झेंडा दाखवला

नवी दिल्ली, २३ मार्च २०२५ : संसद सदस्यांसाठी प्रतिष्ठित जेके टायर-कॉन्स्टिट्यूशन...

पिंपरी चिंचवडकरांनी अनुभवाला लोकसंस्कृतीचा कलाविष्कार – आ. उमा खापरे

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक...

राजकुमार ठाकूर यांनी मिळविला सहस्रबुद्धे चषक कॅरम स्पर्धेत विजय आणि ठरले चषकाचे मानकरी

पुणेपटवर्धन बाग येथील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ असलेल्या एरंडवणे...