नवी दिल्ली – कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पटियाला हाऊसच्या विशेष न्यायालयाने आरोपी म्हणून समन्स बजावले आहे. त्यांना 8 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मनमोहन सिंग यांच्यासह हिंदालको कंपनीचे कुमार मंगलम बिर्ला, पीसी पारेख यांच्यासह 6 जणांनाही न्यायालयाने आरोपी म्हणत समन्स पाठविले आहेत. न्यायालयाने गुन्ह्याचा कट, विश्वासघात तसेच भ्रष्टाचार निर्मुलन काद्यातील तरतुदींनुसार समन्स बजावले आहेत. डिसेंबरमध्येही सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तत्कालिन पंतप्रधानांची जबाब घेण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान कॉंग्रेसने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे निष्कलंक तसेच प्रामाणिक असल्याचा दावा केला आहे. तर भारतीय जनता पक्षाचे अनुराग ठाकूर यांनी “मागील सरकारने अनेक गैरव्यवहार केले. तसेच अशा गैरव्यवहारांना दया दाखविण्यात येणार नसल्याचेम्हटले आहे . आता हे प्रकरण न्यायालयात आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सत्य समोर येईल असे म्हटले आहे.
कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना समन्स
Date: