मुंबई : कारगिल विजय दिवस हा देशासाठी अभिमानाचा दिवस असून या युद्धात शहीद झालेल्या तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवानांप्रती समाज आणि शासन कृतज्ञ राहील, असे भावपूर्ण उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे काढले.
कारगिल संघर्षादरम्यान शहीद झालेल्या भारतीय संरक्षण दलातील जवानांना सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी आज मानवंदना दिली. वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, युद्धात अपंगत्व आलेले जवान, उल्लेखनीय कामगिरी केलेले जवान यांना पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, आमदार राज पुरोहित, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव प्रमोद नलावडे, सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल सुहास जतकर, रिअर ॲडमिरल एम.एस. पवार, मेजर जनरल राजू एडवर्ड, ग्रुप कॅप्टन भारद्वाज तसेच सैनिक कल्याण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
कारगिल युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्याचा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे, असे सांगून श्री.फडणवीस म्हणाले, देशासह देशवासियांचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर सैनिक अहोरात्र पहारा देत असतात. त्यावेळी तो स्वत:सह कुटुंबाचाही विचार करीत नाही. देशासाठी प्राणार्पण केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासह त्यांची जबाबदारी उचलणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.
सैनिकांनी केलेल्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन श्री. देसाई म्हणाले, सैनिकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून त्यांच्या विकासासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविण्यासह त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल. यावेळी डॉ. पाटील म्हणाले, सैनिकांच्या कुटुंबासाठी शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.