पुणे – २७व्या पुणे फेस्टीव्हलमध्ये झालेल्या सौंदर्य – व्यक्तीमत्व स्पर्धेत मिस पुणे फेस्टीव्हल
होण्याचा बहुमान कांचन मुसमाडे हिने पटकावला. फर्स्ट रनरअप वृषाली यादव आणि सेकंड
रनरअप चैत्राली घोडके ठरली. मिस पुणे फेस्टीव्हलसाठी कांचन मुसमाडेचे नाव पुणे फेस्टीव्हलचे
अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी जाहीर केल्यावर तिला ऑनलाईन बिनलाइन फेम अभिनेत्री ऋतुजा
शिंदे आणि रेगे फेम अभिनेता आरोह वेलणकर यांनी मुकुट प्रदान केला. यावेळी पुणे फेस्टीव्हलचे
मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, स्पर्धेच्या संयोजिका सुप्रिया ताम्हणे, अविष्कार नृत्य
अकादमीची जुई सुहास आणि परिक्षक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मिस पुणे फेस्टीव्हलसाठी एकूण ५० जणींची ऑडिशन घेण्यात आली होती. अंतिम फेरीसाठी
त्यातून २० जणींची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी दोन भाग करण्यात आले होते.
पहिल्या भागाची संकल्पना आम्रपालीची सन्यासी लुकमधील तर दुस-या भागाची संकल्पना
अमेरिकन स्ट्रीट वेअरची होती. त्यामुळे दोन टोकाच्या दोन वेगवेगळ्या लुकमध्ये आपले
व्यक्तीमत्व दाखवण्याची संधी स्पर्धकांना मिळाली. स्पर्धकांचा आत्मविश्वास, रॅम्पवर चालण्यातील
आत्मविश्वास, स्टाइल, त्यांचे हास्य, सर्वसमान्यज्ञान, हजरजबाबीपणा, समाज व कुटुंबाबद्दलचा
दृष्टीकोन अशा विविध प्रकारात स्पर्धकांची परिक्षा केली गेली.
स्पर्धेच्या सुरूवातीलाच ज्येष्ठ निर्माता- दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आणि सिनेमॅटोग्राफर विशाल जैन
त्यांच्या नविन चित्रपटासाठी कदाचित नवी हिरोइन मिळेल या दृष्टीने परिक्षण करणार असल्याचे
जाहीर केले. मुख्य तीन विजेत्यांशिवाय एव्हलीनची मिस फेव्हरीट, सृष्टी ढोलेपाटीलची बेस्ट
फोटोजनिक, नम्रता बालसेची बेस्ट स्माइलचे, कांचन मुसमाडेची बेस्ट टॅलंट, शिवानी जाधवची
बेस्ट हेअरसाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी गजेंद्र आहिरे, विशाल जैन आणि मॉडेल
माएशा अय्यर यांनी परिक्षक म्हणून काम बघितले. त्यांचा सत्कार मीरा कलमाडी यांनी करकेला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चेतन आग्रवाल आणि निकू भाटिया यांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात
गणेश वंदनाने झाली. अविष्कारच्या कलाकारांनी नृत्ये सादर केली. या शिवाय मिस पुणे
फेस्टीव्हलमधील माजी स्पर्धकांनीही एकत्रित नृत्याविष्कार सादर केला. रॅम्पवॉक आणि स्पर्धेतील
नृत्याविष्कार सई सुहास यांनी केली होती. या स्पर्धेसाठी झी टीव्हीचे राजेश वैराट, लॅक्मे फॅशन
आणि फॅशन टीव्हीचे रोहन यांगली खास उपस्शित होते. या स्पर्धेसाठी ब्लेझ ब्युटी अकॅडमी,
डिव्हाइन लव्ह, मीरा फोटो फिल्म्स आणि फ्रँगनन्स ब्युटिक आणि बॉडी केअर यांचा सहयोग
लाभला होता. त्या सर्वांच्या सत्कार पुणे फेस्टीव्हलतर्फे करण्यात पुणे फेस्टीव्हलचे मुख्य संयोजक
कृष्णकांत कुदळे, सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे काका धर्मावत यांच्या हस्ते करण्यात आला.
कलर्स मराठी वाहिनी ही यंदाच्या पुणे फेस्टीव्हलची मुख्य प्रायोजक आहे.