Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अब्जोपती सोडून गरजू आम आदमी कडूनच घेणार दुष्काळ निधी । त्यासाठी पेट्रोल आणि डिझेलची करवाढ … अजब सरकारची गजब तऱ्हा…

Date:

पुणे – अंबानी आणि अन्य मोठ्ठे हजारो करोडोंचे मालक सोडून ; अब्जावधींची संपत्ती दाबून ठेवणारी देवस्थाने सोडून आता सरकार दुष्काळ निधी प्रत्येक माणसाच्या खिशातून वसूल करणार आहे . आता कुठे पेट्रोल डीझेल स्वस्त झाल्याचा दिलासा मिळत असतानाच१ ऑक्टोबर पासून होणारी पेट्रोल डीझेल च्या  किमतीतील स्वस्ताई ..  आम आदमीचे हे सुख पहावेनासे झालेल्या सरकारने दुष्काळ निधी च्या नावे पेट्रोल डीझेल च्या किमतीत आणखी कर समाविष्ट करून पेट्रोल डिझेलच्या करात  वाढ करण्याचा निर्णय घेतला  आहे . पाणी साठविण्याचे नियोजन करण्यात अपयशी झालेल्या सरकारच्या कृत्याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागणार आहे . पावूस येतो कि नाही ? असा प्रश्न असताना..  नाही आल्यावर वर्षभर दिवसाआड पाणी मिळणार कि काय ? अशी भीती असताना दुष्काळी झळामुळे रोजगार मिळणेही दुरापास्त होणार असताना वर महागाईचा चटका सोसावा लागला तर शेतकरीच काय अन्य क्षेत्रातील लोकही आत्महत्या करतील । अशी भीती हि सरकारला नसल्याने आश्चर्य वाटत आहे.
महाराष्ट्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर वाढविण्याचा निर्णय घेतला . याच बरोबर सोन्या-चांदीच्या भावातदेखील वाढ होणार आहे.
दुष्काळ निधीसाठी राज्य सरकारने सिगारेट, विडी, दारुवर पाच टक्के अतिरिक्त कर आकारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी पेट्रोल, डिझेलवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किमतीत प्रति लिटर दोन रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय वाढलेल्या किंमती गुरुवारी मध्यरात्री पासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.मागील महिन्यात नीती आयोगाची बैठक झाली होती, त्यात देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी अधिक निधी गरज असल्याचे सांगण्यात आले. व त्यासाठी पेट्रोल, डिझेल आणि इतर काही गोष्टींवरील करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्र सरकार हा निर्णय लागू करणारे पहिले राज्य आहे.
दुष्काळ पडतो तेव्हा सरकारने लोकांना तारायचे –आम आदमीला वाचवायचे ;मदत करायची … हे सोडून याच मदतीच्या नावाखाली सरकार आम आदमी कडून अशाप्रकारे वसुली करणार हे अजबच म्हणावे लागणार आहे

राज्य मंत्रिमंडळाचे आजचे महत्त्वाचे निर्णय
दारू, सिगरेट, शीतपेयावर अतिरिक्त 5 टक्के करवाढ
– एलबीटी रद्द केल्यामुळे पेट्रोल १.५० ते २.५० रुपये कमी होणार होते म्हणजे १ ऑक्टोबर पासून पेट्रोल डीझेल स्वस्त होणार होते , त्याऐवजी प्रतिलिटर २ रुपये करवाढ. म्हणजेच दरावर विशेष फरक पडणार नाही असा दावा – हिरे, सोने आणि दागिन्यांवरील वॅट 1 वरून 1.20 टक्क्यांवर- पुढील 5 महिन्यांसाठी वाढ. 1600 कोटींचा महसूल अपेक्षित एक ऑक्टोबरपासून कर लागू..  बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण अंतर्गत उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालिन निदेशकांचे पॅनल तयार करण्याचा निर्णय.100 हून अधिक पटसंख्या असलेल्या 1835 शाळांमध्ये कला, शारीरिक शिक्षण, आरोग्य, कार्यानुभव यासाठी अतिथी निदेशकांचे पॅनल तयार करणार.27 पारेषण योजना ग्रीन एनर्जी कॉरिडॉर कार्यक्रमांतर्गत राबविण्यास मान्यता, 367 कोटींचा अंदाजित खर्च.20% खर्च राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या निधीतून, 40% नॅशनल क्लीन एनर्जी अनुदान तर 40% कर्ज जर्मन डेव्हलपमेंट बँकेकडून घेण्यास मान्यता. ग्रीन एनर्जी कॉरिडॉर योजनांमधून 2570 मे.वॅ. अतिरिक्त वीज उपलब्ध होणार मुंबई महापालिका अधिनियम, महाराष्ट्र महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णयजात पडताळणी समितीकडे अर्ज केल्याचा पुरावा जोडून निवडणूक लढविणारा बोगस उमेदवार सहा वर्षांसाठी निवडणुकीस अपात्र ठरणार

केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान यांना पश्चिम विभाग केंद्रीय इलेक्ट्रीकल टेस्टिंग लॅबसाठी नाशिक जिल्ह्यातील मौजे शिलापूर येथील 100 एकर जमीन

इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मास कम्युनिकेशन्स या स्वायत्त संस्थेला अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे 6हेक्टर जागा देण्याचा निर्णय

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारत 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार, घरगुती सिलिंडरच्या किमती कमी होऊ शकतात

नवी दिल्ली-टॅरिफ वादादरम्यान भारत आणि अमेरिकेने त्यांचा पहिला करार...

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

नवले पुलाच्या अपघाताची कारणे शोधून आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ...