मोक्षता चौहान ‘हयात पुणे ‘च्या विभाग व्यवस्थापक म्हणून नियुक्त
पुणे– हयात पुणे ने मोक्षता चौहान यांना नुकतेच विभाग व्यवस्थापक (रुम्स डिव्हिजन मॅनेजर) पदावर नियुक्त केले आहे. आपल्या दांडग्या अनुभवांच्या जोरावर आणि अतिथींबरोबरचे त्यांचे चांगले संबंध हयात पुणेला नवीन उंची गाठण्यास मदत करतील. ह्यापुर्वी त्यांनी हॉटेलिंग क्षेत्रात बरेच कार्य केले आहे.
मोक्षता चौहान यांच्याकडे पर्यटन आणि आतिथ्य व्यवस्थापनात पदवी आहे आणि त्या २००८ पासुन ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत.द ओबेराय, हिल्टन,मोवेनपिक सारख्या प्रसिद्ध हॉटेल्स मध्ये त्यांनी कार्य केले आहे.
ह्या पुर्वी देखील पार्क हयात गोव्यामध्ये त्या असिस्टंट फ्रंट ऑफिस मॅनेजर म्हणुन कार्यरत होत्या. पुण्यातील नियुक्तीच्या निमित्ताने आपले विचार व्यक्त करताना त्या म्हणाल्या, हयात नेहमीच माझ्या हदयाच्या खुप जवळ आहे. हयात पुणे टीम बरोबर पुन्हा कार्य करताना माला खुप आनंद होत आहे आणि मी माझ्या कार्यक्षेत्रात निश्चीतच संपूर्ण योगदान देईल.