११ मे रोजी कवी विंदा करंदीकर यांचे ५५ वे पुष्प
पुणे :
‘रसिक मित्र मंडळ’च्या ‘एक कवी -एक भाषा’ मासिक व्याख्यानमालेचे शुक्रवार, दिनांक ११ मे २०१८ रोजी आयोजन करण्यात आले आहे. ख्यातनाम कवी विंदा करंदीकर यांच्यावरील हे व्याख्यान सायंकाळी ६ वाजता पत्रकार भवन, गांजवे चौक येथे होणार आहे.
डॉ.माधवी वैद्य (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ) या कवी विंदा करंदीकर यांचा जीवनप्रवास उलगडणार आहेत.
व्याख्यानादरम्यान डॉ.माधवी वैद्य यांनी तयार केलेली विंदा करंदीकर यांच्यावरील दृकश्राव्य ध्वनिचित्रफीत दाखविण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विंदा करंदीकर यांची कन्या जयश्री काळे असणार आहेत.
‘एक कवी -एक भाषा’मासिक व्याख्यानमालेचे हे ५५ वे पुष्प आहे, अशी माहिती ‘रसिक मित्र मंडळ’ चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांनी पत्रकाद्वारे दिली.
‘रसिक मित्र मंडळ’च्या वतीने विविध साहित्यिक विषयावरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते.