मोबिक्विकने आपल्या अॅपवर 20 रुपयांत उपलब्ध केला इस्टंट लाइफ इन्शुरन्स
नवी दिल्ली: मोबिक्विक या भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल वित्तीय सेवा सुविधेने युजर्ससाठी आपल्या अॅपवर डिजिटल लाइफ इन्शुरन्स दाखल केल्याचे आज जाहीर केले आहे. मोबिक्विकने आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या सहयोगाने पहिलेवहिले मायक्रो इन्शुरन्स उत्पादन दाखल केले आहे. 1 लाख रुपयांच्या जीवनकवचासाठी दरमहा 20 रुपये इतका कमी प्रीमिअम आकारला जाणार आहे. मोबिक्विकने नोव्हेंबर 2018 मध्ये अपघाती विम्यानंतर, डिजिटल इन्शुरन्स क्षेत्रामध्ये केलेली ही दुसरी सर्वात मोठी घोषणा आहे. युजरना निवड करण्यासाठी विम्याच्या रकमेचे तीन पर्याय उपलब्ध आहेत: 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये व 2 लाख रुपये व यासाठी मासिक प्रीमिअम अनुक्रमे 20 रुपये, 30 रुपये व 40 रुपये आहे. मोबिक्विक अॅपवरून पेपरलेस पद्धतीने, 10 सेकंदांच्या 2 टप्प्यांद्वारे डिजिटल लाइफ इन्शुरन्स खरेदी करता येऊ शकतो व योजना तातडीने जारीही केली जाते. मोबिक्विक या श्रेणीतील विमा उपलब्ध करणाऱ्यांच्या संख्येत वाढ करणार आहे आणि अन्य आघाडीच्या विमा कंपन्यांशी सहयोग करण्याचा प्रयत्न करणार आहे. मोबिक्विक ग्राहकांच्या गरजांनुसार उत्पादने समाविष्ट करणार आहे आणि सर्वांसाठी सरसकट एका उत्पादनाऐवजी वैयक्तिक उत्पादने उपलब्ध करणार आहे.
याविषयी बोलताना, मोबिक्विकच्या सह–संस्थापक व संचालक उपासना ताकू यांनी सांगितले, “गेल्या 9 वर्षांमध्ये, मोबिक्विकने भारतातील आर्थिक क्षेत्राचा चेहरा बदलतील आणि आर्थिक समावेशकतेला चालना देतील, अशी उत्पादने तयार केली आहेत. भारतात ज्या प्रकारे वित्तीय सेवांचे वितरण केले जाते त्यामध्ये प्रभावी बदल करण्याच्या उद्देशाने आम्ही लाइफ इन्शुरन्स श्रेणीमध्ये प्रवेश केला आहे. हे क्षेत्र प्रचंड आहे आणि ते झपाट्याने वाढण्याची अपेक्षा आहे. असोचेमने अपास या संशोधन कंपनीबरोबरच्या भागीदारीने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, भारतातील विमा उद्योग 2020 पर्यंत 280 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. येत्या तीन ते पाच वर्षांत, देशातील लाइफ इन्शुरन्स उद्योग वार्षिक 12-15 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे, असेही अहवालात म्हटले आहे. आम्ही विमा क्षेत्रात आणलेले नावीन्य, तयार केलेली उत्पादने ही विमा खरेदी करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करतात आणि ज्यांच्यापर्यंत विमा पोहोचलेला नाही, त्यांच्यासाठी ती किफायतशीर करतात.”
ताकू यांनी नमूद केले, “प्रत्येक व्यक्तीसाठी लाइफ इन्शुरन्स अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु, भारतात त्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. या मायक्रो इन्शुरन्स उत्पादनांच्या व भविष्याचील अन्य वैयक्तिक उत्पादनांच्या मदतीनेआम्ही लाइफ इन्शुरन्स क्षेत्रात बदल आणणार आहोत. आम्ही या क्षेत्रातील नामवंत आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या सहयोगाने लाइफ इन्शुरन्स डिजिटल पद्धतीने उपलब्ध करणार आहोत. वितणाचा उच्च खर्च विचारात घेता, पारंपरिक बँका व विमा कंपन्या यांच्याकडून दुर्लक्षित असणाऱ्या मास मार्केट व उच्चभ्रू ग्राहक वर्गाला सेवा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सर्वसाधारण वित्तीय व हेल्थ अंडररायटिंग यामुळे, उत्पादनाच्या उपयुक्ततेच्या बाबतीतील आव्हानांवर मात करण्याचाही आम्ही प्रयत्न करत आहोत. मोबिक्विक कस्टमाइज्ड पोर्टफोलिओ, ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्यपणे तयार केलेली उत्पादने यांच्या मदतीने भारतात लाइफ इन्शुरन्स उत्पादनांचा स्वीकार करण्यासाठी उत्तेजन देणार आहोत. डिजिटल माध्यम अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते, कारण आमच्या अॅपद्वारे कोणत्याही ठिकाणच्या लाखो युजरना विमा उत्पादने देणे शक्य होते. भारतातील बहुसंख्य जणांकडे लाइफ इन्शुरन्स योजना असेल, असे आमचे स्वप्न आहे.”
आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्स कंपनीचे उप व्यवस्थापकीय संचालक पुनीत नंदा यांनी सांगितले, “मोबिक्विक या भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल मोबाइल वॉलेटशी सहयोग केल्याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतो. सोप्या, पेपरलेस प्रक्रियेद्वारे मोबिक्विकच्या मोठ्या संख्येतील युजरना लाइफ इन्शुरन्स खरेदी करता येऊ शकतो. सुलभता हे लाइफ इन्शुरन्स उद्योगातील सर्वात मोठे नावीन्य आहे, असे मला वाटते. ग्राहक केंद्रितता हे दोन्ही कंपन्यांच्या विचारसरणीच्या केंद्रस्थानी आहे आणि आम्ही दीर्घ व परस्परांना फायदेशीर नाते विकसित करण्यासाठी उत्सुक आहोत.”
मोबिक्विक युजरना योग्य विमा उत्पादन सुचवले जाते, ते ग्राहकांचा सध्याचा प्रोफाइल, माहितीचे आधुनिक विश्लेषण व आर्टिफिशिअल इंटलिजन्स अल्गोरिदम यानुसार निवडले जाते. कंपनीने अलीकडेच अपघाती विमा योजना दाखल केली असून त्यास युजरकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. त्याद्वारे 20 रुपये इतक्या कमी प्रीमिअममध्ये 1 लाख रुपयांचा अपघाती विमा दिला जातो.