विविध कला, संस्कृती आणि साहित्याचादेदीप्यमानवारसा महाराष्ट्राला लाभला आहे.या कला परंपरेतअग्रणी असलेले साहित्य आणि संगीताच्या प्रांतातील दिग्गज म्हणजेच महाराष्ट्राचे वाल्मिकी ज्येष्ठ गीतकार ग.दि.माडगूळकर, अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसविणारेअष्टपैलू लेखक ‘महाराष्ट्र भूषण’ पु.ल.देशपांडे आणि मराठी माणसाच्या हृदयावर आपल्या सुरांनीआपले नाव कोरणारे‘बाबूजी’ म्हणजेच लाडके संगीतकार सुधीर फडके… या त्रयीने आपल्या प्रतिभेनेमहाराष्ट्रात आपले युग निर्माण केले आणि कित्येक दशके मराठी मनावर कायम अधिराज्य गाजवले.महाराष्ट्रातील या तिन्ही सारस्वतांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्तमानवंदनादेण्
ग.दि.माडगूळकरयांनीवयाच्या अवघ्या १६ व्या वर्षीचित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि अल्पावधीतअनभिषिक्त सम्राटपद मिळवले.ग.दि.माडगूळकर आणिसुधीर फडके यांनी मिळून तर मराठी चित्रसृष्टीत आपले एक युग निर्माण केले. त्या दोघांचीअनेक अजरामर गीते “मानाचा मुजरा – अमृतयोग”या कार्यक्रमात पुन्हा अनुभवता येणार आहेत.राहुल देशपांडे यांनी “कानडा राजा पंढरीचा”आणि“शब्दावाचून कळलेसारे” हीगाणीसादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.या बरोबरच हृषिकेश रानडे याने“ऊठ पंढरीच्या राजा”हे गाणे सादर केले. अजितपरब यांनी बाबूजींची काही अजरामर गाणी या कार्यक्रमात सादर केली.‘मुंबईचा जावई’ या चित्रपटातील “आज कुणीतरी यावे” हे गाणे सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातील शरयू दाते हिने सादर केले. तसेच“त्या तिथे पलीकडे” हे चित्रगीत भावगीत गायनात स्वत:चा अनोखा ठसा उमटवलेल्या मालतीपांडे बर्वे यांची नात म्हणजेचप्रियांका बर्वे हिने सादर केलेय.सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर या पर्वाची विजेती स्वराली जाधव हिने “फड सांभाळ” ही लावणी आपल्या खास शैलीत सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. सूरनवा ध्यास नवाछोटेसूरवीर मधील चैतन्यदेवढे आणि सई जोशी यांनी देखील सुंदर गाणी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. साक्षात पु.ल साकारण्यासाठी प्रसिध्द असलेले अतुल परचुरे आणि आनंद इंगळे यांनी पु.लं.चे नाट्यप्रवेश सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.तर सोनिया परचुरे आणि नकुल घाणेकर यांनी गीतरामायणातीलनिवडक गाणी नृत्यबद्ध केलीत.
कार्यक्रमामध्ये ग.दि.माडगूळकर, सुधीर फडके आणि पु.ल.देशपांडे यांच्याबद्दलच्याआठवणी, किस्से त्यांच्या जवळच्या व्यक्तींनीम्हणजेच शरतकुमार माडगूळकर, श्रीधर फडके, ज्येष्ठ नेते शरद पवार, ज्येष्ठसंगीतकार आणि व्हायोलीनवादक पं.प्रभाकर जोग, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, प्रसिध्द अभिनेते सचिन पिळगावकरया मान्यवरांनीजागवल्या आहेत. “मानाचा मुजरा – अमृतयोग”ही शब्दसुरांची मैफल रविवारी ७ एप्रिल रोजी पूर्वार्धदु.१२ आणि उत्तरार्ध संध्या.७वा.