ओतूर- (संजोक काळदंते)
ओतूरच्या श्री कपर्दिकेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त दूरदूरवरून आलेल्या लाखो भाविकांचा महापूर तांदळाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी लोटला होता.आलेल्या भाविकांनी शिवलिंगावर बनवण्यात आलेल्या कलात्मक पिंडींचे दर्शन घेतले अशी माहिती श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे व सचिव वसंत पानसरे यांनी दिली.
दरवर्षी श्रावणी सोमवार निमित्त येथील शिवलिंगावर तांदळाच्या पिंडी तयार केल्या जातात या कलात्मक पिंडीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण राज्यातून भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने येत असतात चालू आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना रांगेत दर्शन घेण्यास सोपे झाले होते.सकाळी मंदिर दर्शनासाठी खुले केल्यावर गर्दीचा ओघ कमी होता मात्र ११ वाजेनंतर गर्दी वाढत गेली. यात्रेनिमित्त गावामधून राम कृष्ण हरी नामाची दिंडी काढण्यात आली होती यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला. श्रावणी सोमवार निमित्त मोठी यात्रा भरली असल्याने ठिकठिकाणाहून आलेल्या भाविकांसह ग्रामस्थांनी देखील भरलेल्या यात्रेचा आनंद घेतला यात्रेतील पाळणे,खेळणी,आणि लागलेल्या स्टॉलमधील खाद्य पदार्थाचा देखील मनमुराद अस्वाद घेवून यात्रा साजरी केली. सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. संपूर्ण श्रावण महिन्याच्या प्रती सोमवारी भव्य यात्रा भरत असते या यात्रेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त संपूर्ण महाराष्ट्रातून येत असल्याने उत्साहपूर्ण वातावरणात यात्रा संपन्न होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कपर्दिकेश्वर देव धर्म संस्था,ग्रामस्थ,ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र थोरात आणि पोलीस स्टाफ,पोलीस ठाण्याच्या हद्दील पोलीस पाटील,पोलीस नागरिक मित्र संघटनेचे स्वयंसेवक यात्रेत तैनात होते. भाविकांच्या आरोग्य सेवेकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूरचे आरोग्य सेवक यात्रेत आरोग्य सेवा देत होते,नारायणगाव वाहतूक नियंत्रण आगार यांच्यातर्फे भाविकांची ने आन करण्यासाठी जादा एस.टी.बसेसची सोय करण्यात आली होती. तिसऱ्या श्रावणी सोमवारची यात्रा मोठ्या दिमाखात संपन्न झाली.
ऐतिहासिक परंपरा असणारा ओतुरचा आखाडा एवढा काही रंगला होता कि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या नामवंत मल्लांच्या कुस्त्या या आखाड्यात चांगल्याच रंगतदार झाल्या दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पावसाचे आगमन झाल्याने कुस्त्या खेळण्यास अडचण निर्माण झाली होती मात्र भर पावसात कुस्ती शौकिनांनी तसेच ग्रामस्थांनी कुस्त्यांचा मनमुराद आनंद लुटला.
पहिली कुस्ती पन्नास रुपयाची झाली.लहान मोठ्या कुस्त्या झाल्या.आखाड्यात सुकाणू कमिटी मध्ये अनिल तांबे,भास्कर डुंबरे,माधवराव डुंबरे,जी.आर.डुंबरे,रघुनाथ तांबे,उल्हास गाढवे,वैभव तांबे,संतोष तांबे,संभाजी तांबे यांनी काम केले कुस्त्या लावण्याचे काम प्रकाश डुंबरे,अविनाश ताजने,अरविंद तांबे,पकानाना डुंबरे यांनी,पंच म्हणून छबुराव थोरात ,धनंजय डुंबरे,अशोक डुंबरे यांनी काम पहिले.ओतूर गावचे सुपुत्र पुणे म.न.पा.चे नगरसेवक विशाल तांबे यांचा आखाड्यात विशेष सत्कार करण्यात आला.