पुणे -मोदी, शहा फडणवीस काँग्रेस नेत्यां विषयी असत्य, तर्कहीन व बदनामी कारक जाहीराती प्रदर्शीत करून, काँग्रेस नेत्या इंदीराजींनी पाकिस्तान चे दोन तुकडे करून बांगला देशा ची निर्मिती केली, अशा काँग्रेस चा विजय झाल्यास.. पाकिस्तान मध्ये आनंदोत्सव होईल (?) असे पोरकट, बालीश व हास्यस्पद जाहीराती देत आहेत.!
उलट पक्षी मोदी काळातील आज पर्यंतच्या घटना पाहता ‘मोदी प्रणीत भाजप’चाच’ पाकिस्तान कडे ओढा असल्याचे पदोपदी जाणवत असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.
डीआरडीओ चे संचालक व संघाची पार्श्वभुमि असलेले प्रदीप कुरुलकर.. यांना ब्रम्होस क्षेपणास्त्रें इ संशोधना बाबतची माहीती पाकला पुरवली हे उघड होऊन देखील..? त्यांचे पुढे काय..झाले ..? त्यांचेवर देशद्रोहाचा खटला सरकार कधी चालवणार..? असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला..!
तसेच, मोदी सरकारचे काळातच.. अतिरेकी .. हल्ला प्रकरणी .. पठाणकोट मध्ये आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेस जाण्याची अजब परवानगी मोदी सरकारने दिली ही देखील गंभीर आक्षेपार्ह बाब होतीं
नोट बंदी चे कारण हे ‘अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी आहे’ असे सांगितले, मात्र नोट बंदी नंतर लोक पेटीएम समोर लाईन लावत होते मात्र त्याच वेळी महीना भराचे आंत.. अतिरेक्यांकडे २,००० च्या नव्या लाल नोटा सापडल्या हे कशाचे द्योतक आहे..? त्याची चौकशी का केली गेली नाही..?
बिन बुलाये मेहमान प्रमाणे.. आपले पंतप्रधान हे
पाकिस्तान पंतप्रधान यांच्या वाढदिवसाला बिर्याणी खायला गेले ..तेंव्हा देशाची अस्मिता कुठे गहाण ठेवली होती..?
२०१९ पुलवामा वरील अतिरेकी हल्ल्याच् पुढे काय झाले ..? तत्कालीन देविंदर सिंह.. दोन अतिरेक्यांसह पकडला .. त्याचे पुढे काय ..? पुलवामा हल्ल्याची जबाबदारी का निश्चित केली गेली नाही..?
देशातील कांदा ऊत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीस लावून .. पाकीस्तान कांदा आयातीस परवानगी कुणी दिली ..? या सर्व घटनांमुळे.. वास्तविक कोण निवडुन आल्याने पाकिस्तानात आंनंद साजरा केला जाईल ..? हे सुस्पष्ट आहे.. त्यामुळे मोदींच्या भाजपची देश – निष्ठा पाकिस्तान व चिन बाबत ऊधडी पडली असल्याचे प्रतिपादन ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी आज पत्रकार परीषदेत केले.
पाकिस्तान कडे ओढा कोणाचा..? काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचा सवाल..!
Date: