Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यासाठी कार्यशाळा

Date:

पुणे दि.८: भारत निवडणुक आयोगाच्या शिफारशीनुसार मतदार यादीतील तपशीलाशी जोडण्यासाठी व प्रमाणीकरणासाठी मतदारांची ऐच्छिकपणे आधारची माहीती संग्रहित करण्याबाबतच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची ऐच्छिकपणे आधारची माहिती मतदार यादीतील तपशीलाशी जोडण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज क्रमांक ६ ब ची नोंदणी करून या कार्यशाळेला प्रारंभ केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यशाळेला निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, तहसिलदार रूपाली रेडेकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखाप्रमुख उपस्थित होते.

अधिकारी तसेच त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांचा अर्ज क्र.६ ब भरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी केले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सावंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना ६ ब चा अर्ज ऑनलाईन भरण्याबाबतची माहिती दिली.

पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाची कार्यालये, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्या कार्यालयामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक कार्यालयामध्ये यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.

मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. ६ ब भारत निवडणुक आयोगाच्या www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा ‘वोटर हेल्पलाईन’ अँप आपल्या डाऊनलोड करुन भरता येईल . जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपला आधार क्रमांक मतदार यादीच्या तपशीलाशी जोडण्याची कार्यवाही करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...

“स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘आरोग्यवारी’ उपक्रमात विशेष सहभाग

वारीतील महिला सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; ‘आरोग्यवारी’ उपक्रमातून व्यापक व्यवस्था पुणे,...

नियमांचा भंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे नोंदवा

पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांची भूमिका : हिंजवडी भागातील नागरी समस्यांवर...