अटल बस सेवा योजनेचे महापौर यांच्या हस्ते उदघाटन

Date:

5 रुपयां मध्ये संगमवाडी ते महात्मा फुले मंडई प्रवास

पुणे — पुणे महानगर परिवहन महामंडळ योजनेअंतर्गत अतिशय माफक दरात राबविल्या जाणाऱ्या अटल बस सेवा योजनेचे  महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज संगमवाडी ते मंडई सेवेचे उदघाटन करण्यात आले .सर्वसामान्य ,गरीब व गरजू प्रवाश्यांना परवडेल आणि गरजेच्या ठिकाणी म्हणजे संगमवाडी ते मंडई या महत्त्वाच्या मार्गावर ही सेवा आजपासून सुरू करण्यात येत आहे .          या योजनेसाठी स्थानिक नगरसेविका   सौ. सोनाली लांडगे  यांच्या  पाठपुराव्यातून व प्रयत्नातून पुणे महानगर परिवहन मंडळ लि.  यांच्या अटल बस योजना आज सुरू झाली . या मार्गावर  कमी प्रमाणात बस सेवा सुरू होती परंतु आता मंडई मध्ये जाणाऱ्या ,लक्षमी रस्त्यावर ,तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर आणि एकूणच मुख्य पुण्यात आणि पेठेत अतिशय माफक  म्हणजे अवघ्या 5 रुपयात प्रवास करण्यास नागरिकांना मिळणार आहे .या योजनेचे स्थानिक महिला व ज्येष्ठ नागरिक यांनी स्वागत करून आनंद व्यक्त केला आहे       संगमवाडी ते महात्मा फुले मंडई बस मार्गाचे उदघाटन पुण्याचे महापौर मोहोळ व जगदीश मुळीक यांच्या हस्ते आज करण्यात आले. कार्यक्रमास स्थानिक नगरसेवक आदित्य मळावे, अभय सावंत, हरीष निकम , सौ. चेतना केरुरे सह व्यवस्थापकीय संचालक पीएमपीएल दत्तात्रय झेंडे वाहतूक व्यवस्थापक पीएमपीएल, संदीप काळे, संतोष लांडगे, सुभाष जेऊर, चंद्रशेखर गव्हाणे, सुरेश गायकवाड,रुपेश सोरटे, व संगमवाडी येथील अनेक नागरिक उपस्थित होते. संगमवाडी येथून पूर्वी ६२ नं. बस संगमवाडी ते मार्केटयार्ड या मार्गे चालू होती. परंतु गेली ६ वर्ष ही बस सेवा बंद असल्याने नागरिकांना रिक्षा किंव्हा स्वतःच्या वाहनाचा वापर करावा लागत होता. याचा त्रास स्थानिकांना होत होता. आता नागरिकांना केवळ 5 रुपयां मध्ये संगमवाडी ते महात्मा फुले मंडई प्रवास करता येणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सदर बस सेवा सुरू झाल्याने नागरिकांनी नगरसेविका लांडगे व पीएमपीएलचे आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विद्यार्थ्यांचे मातीशी नाते जोडण्यासाठी विद्यार्थी सहायक समितीचा पुढाकार

समितीच्या संकुलात तंत्रज्ञानाधारित कृषी प्रकल्पाचे उद्घाटन; ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि...