‘बसंत उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम २०१९’ चे २४ फेब्रुवारी रोजी आयोजन
पुणे : बांगीया संस्कृती संसद ने ‘बसंत उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम २०१९’ चे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ९.१५ पासून पुढे होणार आहे. उत्सवाचे १४ वे वर्ष असून, कार्यक्रम एम्प्रेस गार्डन येथे होणार आहे. हिवाळ्याचे दिवस संपून हवेत नावीन्य आल्याची चाहूल देणारा हा वसंतोत्सव असतो, अशी माहिती बांगीया संस्कृती संसदच्या उपाध्यक्ष मधुमिता घोष यांनी पत्रकाद्वारे दिली.
सास्वती गुहा ठाकुर दूरदर्शन बंगालीच्या पहिल्या निवेदक व अभिनेत्री आणि त्यांची कन्या श्रेया गुहा ठाकूर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
श्रेया गुहा ठाकूर या ‘रबिन्द्र संगीत’ सादर करणार आहेत. त्यांना तबल्यावर श्रेष्ठ कलाकार बिप्लाब मोंडल आणि सिन्थेसायझर वर सुब्रता मुखर्जी (बाबू) साथ सांगत करतील.
यावेळी सादर होणार ‘बसंत बंदना’ हा समर्पित कार्यक्रम गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘नबीन’ मधील निवडक गाण्यावर आधारित आहे. वसंत ऋतूतील सकाळच्या विविध छटांचे दर्शन नृत्यातून घडविणार आहेत.
बसंतोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम ज्यांचे मूळ मूळ गुरुदेव रवींद्रनाथ टागोरच्या जन्मस्थानी शांतीनिकेत आहे. ज्यामध्ये लोकांना एकत्र आणून विविध रंग रुपी आनंद आणि प्रेम देते, असे या कार्यक्रमाबद्दल बोलताना मधुमिता घोष म्हणाल्या.