कोल्हापूर – कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या सरकारी वाहनाला अपघात झाला आहे. जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला कोल्हापूरच्या विमानतळाकडे जात असताना सायंकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी किरकोळ अपघात झाला. या अपघातात विश्वास नांगरे पाटील किरकोळ जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी गारगोटी येथे एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. कोल्हापूरच्या विमानतळावर त्यांच्या स्वागताला जात असताना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांचे सरकारी वाहन रस्त्याच्या कडेला एका खोदलेल्या चरीत घसरले. या अपघातात कोणतीही मोठी हानी झाली नाही मात्र विश्वास नांगरे पाटील यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे