पुणे : ‘‘कोविड -१९ अर्थात कोरोनामुळे जग ठप्प झाले आहे. आम्ही अत्यंत
अनिश्चित, कठीण स्थितीत जगत आहोत. याहीपेक्षा कोरोनामुळे
उदभवलेली स्थिती विशिष्ट गटांसाठी अनेक पटीने धोकादायक ठरत आहे
. त्यांचे जगणे अतिशय असुरक्षित झाले आहे. कोरोनाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील सर्वात जास्त नुकसानग्रस्त राज्य आहे. सीएएफ इंडिया आपल्या भागीदारांसोबत सर्वांत वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह असुरक्षित गटांना मदत करण्यासाठी फिल्डवर काम करीत आहे,’’ अशी माहिती चॅरिटीज एड फाउंडेशन (सीएएफ) इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी बत्रा यांनी दिली.
बत्रा म्हणाल्या,‘‘वैद्यकीय कर्मचारी संसर्गजन्य भागात काम करत आहेत. अशा ठिकाणी या कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. तरीही ते त्यांचे आयुष्य धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवित आहेत. पुणे महापालिकेने विविध भागात आयसोलेशन प्रभाग तयार केले आहेत. त्या ठिकाणी काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सीएएफ इंडियाने टेट्रा पाक प्रा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) च्या सहकार्याने ३ हजारपेक्षा जास्त ‘पीपीई किट’ची मदत केली आहे. आमची टीम अशा प्रकारच्या कार्यक्रमांना पाठिंबा देत राहील. आम्ही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत उभे आहोत.’’
‘‘सीएएफ इंडियाने आतापर्यंत शहरी झोपडपट्टीत राहणाऱ्या, तसेच गावी परत गेलेल्या नागरिकांना मदत केली आहे. तसेच या संकटाच्या वेळी स्वच्छता राखणारे कर्मचारी, बांधकाम कामगार, आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी सुरक्षित राहण्यासाठी अन्नाची पाकिटे, पीपीई किट्स देऊन मदत केली आहे. आमच्या सर्व देणगीदारांचे आभारी आहोत. ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. वयक्तिक दृष्ट्या मदत करून सदर काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. अशा आमच्या सर्व देणगीदारांचे आभारी आहोत,’’ असेही बत्रा यांनी सांगितले.
………
सीएएफचे महाराष्ट्रातील योगदान ः
– पुण्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना ३००० पीपीई किट दिल्या
– आरोग्य विभागांसाठी १० हजार एन -९५ मास्क पुरविले
– १४५ पेक्षा जास्त बांधकाम कामगारांना आवश्यक खाद्यपदार्थांचे वाटप केले
– ८०० हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संरक्षक उपकरणे दिली
– मुख्यमंत्री मदत निधीसाठी १ कोटी रुपयांचा निधी
……………
सीएएफचे देशातील अन्य उपक्रम ः
– आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक आणि राजस्थानमधील मुख्यमंत्री
मदत निधीसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये.
– मध्य प्रदेश- छत्तीसगडमध्ये ९०० हून अधिक स्थलांतरित कामगारांच्या
कुटूंबांना अन्न पुरविले
– २,००० हून अधिक निराधार लोकांची आरोग्य तपासणी
– ७८०० पेक्षा जास्त कुटुंबांना सरकारकडून लाभ, आर्थिक मदत मिळवून दिली
– दिल्लीतील जेजे कॉलनीत राहणाऱ्या रोजंदारीवर काम करणाऱ्यांना रेशन वाटप
– गुरुग्राम आणि दिल्लीमध्ये स्वच्छता कामगारांना ७८५ पेक्षा जास्त वैयक्तिक
संरक्षक साधनांचे वितरण
– गुरुग्राम, हरियाणा महानगरपालिकेच्या कामगारांसाठी ५,००० हून अधिक
फेस शिल्डचे वाटप
– जागरूकता अभियान आणि स्वयंसेवी संस्था सल्ला उपक्रम
– ॲस्ट्रॅजेनिका फार्मा लि. च्या भागीदारीतून पंजाब, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधील आरोग्य विभागांना १ लाख एन-९५ मास्कचा पुरवठा
– हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधील सुमारे २००० बांधकाम कामगारांना आवश्यक खाद्यपदार्थ
– गुजरातमधील १२०० हून अधिक पोलिसांना पीपीई किट्स पुरविल्या