देशातील आघाडीची विमा कंपनी एसबीआय लाइफ इन्शुरन्सने आपल्या न्यू बिझनेस प्रीमियममध्ये ३२ टक्क्यांची वाढ नोंदवली असून ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत एकूण ९४७० कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षाच्या याच कालावधीत ही आकडेवारी ७२०० कोटी रुपये होती.
संरक्षणावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत एसबीआय लाइफचे संरक्षण न्यू बिझनेस प्रीमियम १६०० कोटी ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांत १०६० कोटी रुपयांवर गेले आहे. गेल्या वर्षातल्या या कालावधीत ही आकडेवारी ३९० कोटी रुपये होती व यंदा त्यात १७० टक्क्यांची वाढ झाली आहे. वैयक्तिक न्यू बिझनेस प्रीमियम १४ टक्क्यांनी वाढून ६६०० कोटी रुपयांवर गेला आहे, तर वर्षभरापूर्वी या कालावधीत ही आकडेवारी ५७९० कोटी रुपये होती.
एसबीआय लाइफचा करोत्तर नफा ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांत १३ टक्क्यांनी वाढून ८७० कोटी रुपयांवर गेला आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीतील करोत्तर नफा ७७० कोटी रुपये होता.
कंपनीचे सॉल्व्हन्सी गुणोत्तर डिसेंबर २०१८ मध्ये २.२३ च्या दमदार पातळीवर राहिले असून नियामक आवश्यकता केवळ १.५० आहे.
एसबीआय लाइफची व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्ता डिसेंबर २०१८ पर्यंत १,११,६३० कोटी रुपयांवरून २०.२ टक्क्यांनी वाढून १,३४,१५० कोटी रुपयांवर गेली असून डेट- इक्विटी मिक्स ७८ : २२ आहे. डेट गुंतवणुकीचा ९० टक्के भाग एएए आणि सॉव्हेरियन इन्स्ट्रुमेंट्समध्ये आहे.
कंपनीचे वितरण नेटवर्क वैविध्यपूर्ण असून त्यात १,७४,६५१ प्रशिक्षित विमा व्यावसायिक, देशभरातील ८५९ कार्यालये, दमदार बँकइन्शुरन्स चॅनेल, एजन्सी चॅनेल आणि कॉर्पोरेट एजंट्स, ब्रोकर्स, मायक्रो एजंट्स, कॉमन सर्व्हिस सेंटर्स, विमा विपणन संस्था, वेब अग्रीगेटर्स व थेट व्यवसाय यांचा समावेश आहे.
एसबीआय लाइफ इन्शुरन्सबद्दल
एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची (एसबीआय लाइफ/द कंपनी) स्थापना २००१ मध्ये झाली असून ती स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बीएनपी पारिबस कार्डिफ ए.ए. यांची संयुक्त भागिदारी आहे. एसबीआय लाइफ ही भारतातील आघाडीची जीवन विमा कंपनी आहे. एसबीआय लाइफचे अधिकृत भांडवल २०.० अब्ज आणि पेड अप भांडवल १०.० अब्ज आहे.
एसबीआय लाइफतर्फे जीवन विमा आणि निवृत्ती वेतन उत्पादनांची सर्वसमावेशक श्रेणी स्पर्धात्मक किंमतीत उपलब्ध करण्यात आली असून ग्राहक सेवेचा उच्च दर्जा आणि जागतिक दर्जाची कार्यकालीन क्षमता यांची खात्री कंपनीतर्फे दिली जाते. कंपनीने वैयक्तिक आणि समूह उत्पादने उपलब्ध केली आहेत व त्यामध्ये विविध प्रकारच्या ग्राहकांच्या विमाविषयक गरजांसाठी बचत तसेच संरक्षक योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
एसबीआय लाइफकडे बहुआयामी वितरण नेटवर्क असून त्यात विस्तारित एसबीआयबरोबर बँकइन्शुरन्स चॅनेलचा समावेश आहे. या नेटवर्कला बँकेच्या देशभरातील २२ हजार शाखांचे पाठबळ लाभलेले आहे. एसबीआय लाइफकडेही ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत १,१३,०४५ उत्पादनक्षम एजंट्सचे अतिशय मोठे नेटवर्क कार्यरत आहे. कंपनीच्या इतर वितरण माध्यमांमध्ये थेट विक्री आणि कॉर्पोरेट एजंट्स, ब्रोकर्स, विमा विपणन संस्था व इतर मध्यस्थांचा समावेश आहे. ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत कंपनीच्या देशभर पसरलेल्या नेटवर्कमध्ये ८४८ कार्यालयांचा समावेश होतो व त्यांच्याद्वारे ग्राहक गरजा प्रभावीपणे आणि कार्यक्षमपणे पूर्ण केल्या जातात. कंपनीची व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्ता ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत १२६१.७ अब्ज आहे.
कंपनीची राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) येथे नोंदणी झालेली आहे.