या व्हिडिओच्या अंताला धोनी यांनी सर्वांना उद्देशून महत्त्वपूर्ण संदेश दिला. ते म्हणाले, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. विश्रांती घ्या, स्वतःला वेळ द्या आणि तुमच्या निरोगी आरोग्यावर गुंतवणूक करा, याचा चांगला फायदा दिसून येईल.
मुंबई, ३१ जानेवारी २०२५ – महिलांच्या आरोग्याला प्राधान्य द्या, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे हा महत्त्वपूर्ण संदेश प्रसिद्ध क्रिकेटपटू एम.एस.धोनी आणि एमक्युअर फार्माच्या कायमस्वरुपी संचालिका नमिता थापर यांनी एकत्रितरित्या दिला.
नुकताच ‘अनकण्डिशनल युअरसेल्फ विथ नमिता’ या नमिता थापर यांच्या पोडकास्ट चॅनलवर महिलांच्या आरोग्याबाबत माहिती देणारा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला होता. महिला घराच्या आधारस्तंभ असतात. बरेचदा त्यांच्या आरोग्याबाबत हेळसांड होते किंवा त्यांच्या आरोग्याबाबत प्राधान्य दिले जात नाही, हा मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमातून थापर यांनी मांडला. महिलांच्या आरोग्याबाबत मोकळेपणाने संवाद व्हावा, विचित्र प्रवृत्तींपासून स्वतःला दूर रहावे, आपल्या आरोग्यबाबत त्या जागरुक राहतील याकरिता प्रोत्साहन देणे आदी मुद्दे दोघांच्या संवादातून व्हिडिओत मांडले गेले.
एमक्युअरच्या अर्थ मोहिमेचा भाग असलेल्या या चर्चेत महिलांना त्यांच्या सामाजिक दृष्टीकोनाबद्दल ज्ञात करण्यात आले, आरोग्याचे महत्त्व समजावण्यात आले. महिलांना निरोगी आरोग्य मिळावे याकरिता आवश्यक शारिरीक कमतरता भरुन निघण्याकरिता अर्थ बाय एमक्युअर हे सप्लिमेंट उपलब्ध आहे. हा पूरक आहार महिलांना सुदृढ आयुष्य ध्यानात ठेवून बनवण्यात आले आहे हे आवर्जून सांगण्यात आले.
या संवादात नमिता थापर यांनी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. गप्पा रंगात आल्यावर नमिता थापर यांनी अचानक धोनी यांना त्यांच्या आणि पत्नी साक्षीच्या शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी विचारुन गुगली टाकली. आपल्याला काहीच माहिती नसल्याचे धोनी यांनी चर्चेदरम्यान मान्य केले. महिला कुटुंबाचा आधारस्तंभ आहेत मात्र अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते हा मुद्दा दोघांनीही मान्य केला.
बरेचदा आपल्या आरोग्याबद्दल महिलांनी बोलायला सुरुवात केली की घरातल्या इतर सदस्यांकडून कानाडोळा होतो. महिलांच्या आजारपणाबद्दल गृहित धरले जाते. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांनी या मुद्द्यावर आक्षेप नोंदवला. ही फारशी गंभीर बाब नाही असे सांगत घरातील महिलांना टाळण्याऐवजी तातडीने लक्ष द्या, आवश्यक काळजी घ्या. तुम्हांला घरातील महिलांच्या आरोग्याविषयी माहिती असायलाच हवी, त्यांच्या आरोग्याच्या तक्रारीवर लक्ष द्या, कानाडोळा करु नका, असे आवाहन धोनी यांनी केले. महिलांच्या समस्यांबाबत उपहासात्मक टीका किंवा उदासीनता नको, आपल्या संस्कृतीत स्त्री-पुरुषांना समान वागणूक मिळायला हवी, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली. महिलांना आरोग्याबाबत खुलेआमपणे बोलायला येण्यसाठी आपण त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे जेणेकरुन त्या आपल्या आरोग्याची नियमित तपासणी आणि उपचार घेतील, असेही ते म्हणाले.
महिलांच्या आरोग्याबाबत आग्रही भूमिका घेणा-या नमिता थापर यांनी क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी यांच्या वक्तव्यावर दुजोरा दिला. कदाचित ती महिला मासिकपाळीपूर्वी होणा-या स्वभाव बदलांचा सामना करत असावी किंवा शरीरात हार्मोन्स बदल घडत असावे, या समजुतीने अनेकदा महिलांना बोलण्यापासून प्रवृत्त केले जाते. महिलांच्या आरोग्यासंबंधी तिला पाठिंबा, सहानुभूती द्या. कोणत्याही महिलेचे आरोग्य तिच्या खासगी तसेच व्यावसायिक जीवनात अडथळा ठरत नाही, असेही थापर यांनी आवर्जून सांगितले.