नव्या प्रतिभाशाली तरुण गायकांच्या गाण्यांचा ‘पेहली गूंज’ हा आल्बम सादर

Date:

बांधकाम क्षेत्रात आपले नाव प्रस्थापित केल्यानंतर आता पुण्याच्या पुष्पगंगा व्हेंच्युअर्सने संगीत जगतात पदार्पण केले असून पेहली गूंज हा आपला पहिला हिंदी गाण्यांचा आल्बम सादर केला आहे. प्रशंसनीय वैशिष्ट्य म्हणजे या आल्बममधून नव्या प्रतिभाशाली तरुण गायकांना प्रसिद्धी देण्यात आली आहे. त्यातील दोन गायकांनी टीव्हीवरील व्हॉईस इंडिया किड्स आणि सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या लोकप्रिय संगीत कार्यक्रमात आपल्या यशस्वी कामगिरीने नाव व प्रसिद्धी मिळवली आहे.

यासंदर्भात पुष्पगंगा व्हेंच्युअर्सचे व्यवस्थापकीय संचालक अम्मुल गोएल म्हणाले, आम्ही असामान्य प्रतिभाशाली अशा तीन तरुण गायकांना सादर करत आहोत. त्यांची गाणी या आल्बमद्वारे सादर करुन आम्ही त्यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचे ठरवले आहे. यापुढची पायरी म्हणजे या गायकांच्या संगीत मैफलींचे देशभरातील सर्व प्रमुख शहरांत, तसेच परदेशांतही आयोजन करणे. यामध्ये पुणे, मुंबई, बंगळुरू, लखनौ, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा, नागपूर, चंडीगड व जयपूर या प्रमुख शहरांचा समावेश असेल, जेथे हे तरुण आपली संगीताप्रतीची आकांक्षा पूर्ण करु शकतील.

हे तीन गायक म्हणजे अक्षता संब्याल (वय १५), प्रशांत सिंग कलहंस (वय १७) व जसु खान मीर (वय १४)

अक्षता संब्याल : अक्षता ही बंगळुरुची रहिवासी असून ती ‘व्हॉईस इंडिया किड्स’ स्पर्धेतील स्पर्धक आहे. तिच्या नादमधुर आवाजाने याआधीच ‘गुंजाइश’ या लघुपटाद्वारे चित्रपट क्षेत्रात तरंग उमटवणे सुरू केले आहे. बॉलिवूडसाठी गायचे तिचे स्वप्न आहे.

प्रशांत सिंग कलहंस : प्रशांतने लोकप्रिय चित्रपटगीते दमदारपणे सादर करुन याआधीच आपले राहते शहर लखनौतील रसिकांचे मन जिंकले आहे. या होतकरु प्रतिभावान गायकालाही बॉलिवूडमध्ये पार्श्वगायन करण्याची आकांक्षा आहे.

जसु खान मीर : राजस्थानातील या बासरीप्रेमी किशोराने वयाच्या पाचव्या वर्षी संगीत शिकण्यास सुरवात केली असून ‘व्हॉइस इंडिया किड्स’ व ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या दोन्ही स्पर्धांत लोकप्रियता मिळवून भारतीय दूरचित्रवाणी जगतात याआधीच आपला ठसा उमटवला आहे.

पेहली गूंज या आल्बममध्ये मैत्री, प्रेम, इमानदारी व देशभक्ती अशा विविध भावभावनांचा आविष्कार घडवणारी गाणी आहेत. हे गीतलेखन बाजीराव मस्तानीमेरी कोमरेस २व अशा अनेक चित्रपटांचा प्रसिद्ध गीतकार प्रशांत इंगोले याने केले आहे. आल्बममधील पाच गाण्यांपैकी दोन गाण्यांचा व्हिडिओ आज सादर करण्यात आला. यातील कुछ भी नही या गाण्याला श्रेयस पुराणिक याने संगीत दिले असून यारा तेरी यारी या गाण्याला विक्रम माँट्रोज याने संगीत दिले आहे.

या आल्बमचा व्हिडिओ सादर करण्याची पुष्पगंगाची योजना असून तो लवकरच सर्व रेडिओ, टीव्ही व ऑनलाईन मीडियावर सादर केला जाईल.

या प्रतिभाशाली गायकांना मैफली आणि खासगी कार्यक्रमांत गाणी सादर करण्यास आमंत्रित केल्यास त्यांचे कौशल्य सर्व वयोगटांना भावेल. सध्या केवळ लोकप्रिय पार्श्वगायकांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा प्रघात आहे, पण या गायकांना संधी देण्यासाठी प्रायोजक पुढे आले तर हे गायक नक्कीच हा प्रघात बदलतील.

स्वॅगलिव्ह पचे सादरीकरण

अम्मुल पुढे म्हणाले, “आम्ही केवळ टीव्हीवरील तरुणांनाच निवडत नाही. भारतात खूप बुद्धिमान युवक आहेत, पण त्यांना कुणाशी संपर्क साधायचा, कुठे जायचे याबाबत काहीच ठाऊक नाही. त्यामुळे ते आपली स्वप्ने साकारु शकत नाहीत अथवा प्रसिद्धीच्या झोतात येऊ शकत नाहीत. यासाठीच आम्ही आता आमचे ‘स्वॅगलिव्ह’ हे ॲप सादर करत आहोत. हे ॲप म्हणजे ऑनलाईन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे, जेथे भारतातील प्रत्येकजण आपले बुद्धिकौशल्य प्रदर्शित करु शकेल. हे कौशल्य केवळ संगीतापुरते मर्यादित नसेल तर नकला, विनोद, नृत्य, आरजे, एमजे, व्हीजे अशा क्षेत्रांतील व सर्व वयोगटांसाठी असेल. यातून या कलाकारांना आघाडीच्या रिअलिटी शोंचा भाग बनण्याचीही संधी मिळेल व त्यांची ज्यासाठी खरोखर पात्रता आहे ते नाव व प्रसिदधीही मिळवू शकतील.”

हे ॲप पुढील महिन्यात सादर होण्यासाठी सज्ज आहे. हा संपूर्णपणे स्वदेशात विकसित झालेला सोशल व्हिडिओ/ऑडिओ/चॅटिंग प्लॅटफॉर्म आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा स्वॅगलिव्ह ॲप बनावट वापरकर्त्यांना वगळून या प्लॅटफॉर्मला विश्वसनीय व स्पर्धात्मक बनवेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...