पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 25 हजार 433

Date:

पुणे विभागातील 7 लाख 84 हजार 684 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 9 लाख 28 हजार 732 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि. 14 : पुणे विभागातील 7 लाख 84 हजार 684 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 9 लाख 28 हजार 732 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 25 हजार 433 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 18 हजार 615 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.00 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.49 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 6 लाख 68 हजार 126 रुग्णांपैकी 5 लाख 57 हजार 424 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 99 हजार 899 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 हजार 803 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.62 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 83.43 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 75 हजार 428 रुग्णांपैकी 64 हजार 454 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 10 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 964 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 73 हजार 439 रुग्णांपैकी 61 हजार 709 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 572 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 158 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 56 हजार 737 रुग्णांपैकी 50 हजार 444 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 431 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 862 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 55 हजार 02 रुग्णांपैकी 50 हजार 653 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 521 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 828 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 13 हजार 449 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 10 हजार 112, सातारा जिल्ह्यात हजार 1 हजार 80, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 301, सांगली जिल्ह्यात 657 तर कोल्हापूर जिल्ह्यात 299 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 11 हजार 692 आहे. पुणे जिल्हयामध्ये 9 हजार 843, सातारा जिल्हयामध्ये 616, सोलापूर जिल्हयामध्ये 787, सांगली जिल्हयामध्ये 265 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 181 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 56 लाख 15 हजार 070 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 9 लाख 28 हजार 732 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

(टिप :- दि. 13 एप्रिल 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे 2 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू:पावसाच्या पाण्याने भरलेल्या उघड्या खड्ड्यात बुडून अंत

पुणे-कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याला जीव गमवावा लागल्याची...

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर आणि अनधिकृत प्री-स्कूलवर सभागृहात व्यक्त केली तीव्र चिंता

तातडीने कारवाई करण्याची केली मागणी. पुणे:महाराष्ट्र विधानमंडळाच्या चालू पावसाळी अधिवेशनादरम्यान,...

साचलेल्या पाण्यात करंट उतरल्याने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई-मुंबई-ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान आणखी एक धक्कादायक घटना...

भारतातील 84% महिला उद्योजिका डिजिटल पेमेंट साधनांचा करतात वापर

डीबीएस बँक इंडियाच्या ‘वुमन अँड फायनान्स’ संशोधन अभ्यासातील निष्कर्ष पेमेंट्सपलीकडे...