Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या बेहिशेबी व्यवहारांचा प्राप्तिकर विभागाने लावला शोध

Date:

नवी दिल्‍ली, 2 ऑगस्‍ट 2022

प्राप्तिकर विभागाने 20 जुलै 2022 रोजी गुजरातमधील काही नामवंत बड्या उद्योग कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे घातले आहेत. यात, वस्त्रोद्योग, रसायने, पॅकेजिंग, बांधकाम व्यवसाय आणि शिक्षण अशा क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी खेडा, अहमदाबाद, मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता इथल्या 58 जागी ही कारवाई झाली आहे.या शोधमोहिमेत, अधिकाऱ्यांना  1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या बेहिशेबी व्यवहारांचा शोध लागला आहे. आतापर्यंत, 24 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि 20 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने, सोने जप्त करण्यात आले आहे.

या शोधमोहीमेत, अधिकाऱ्यांना अनेक कागदपत्रे आणि डिजिटल डेटा पुरावा म्हणून सापडले असून ही सर्व सामग्री जप्त करण्यात आली आहे. या पुराव्यावरुन असे निष्पन्न झाले आहे, की, या सगळ्या व्यावसायिकांनी विविध मार्गांनी करचुकवेगिरी केली आहे. यात, खातेवहीच्या पलीकडे बेहिशेबी रोख रकमेचे व्यवहार, बनावट खरेदी व्यवहार, आणि बांधकाम व्यावसायातील खोट्या पावत्या अशा गैरव्यवहारांचे पुरावे सापडले आहेत. या सगळ्या व्यावसायिकांनी कोलकात्यातील काही बनावट कंपन्यांच्या आधारे हवालाचे व्यवहार केल्याचेही या तपासात आढळले आहे. रोख आणि ‘सराफी’म्हणजे असुरक्षित मार्गाने काही उत्पन्न मिळवल्याचेही निष्पन्न झाले आहे.  

त्याशिवाय,यातील शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांनी ऑपरेटर्सच्या मदतीने कंपनीच्या समभागांच्या किमती बनावट पद्धतीने जास्त दाखवून त्यातही नफेखोरी केली आहे. त्याशिवाय प्रवर्तकांच्या वैयक्तिक उपयोगासाठी, खोटी नावे दाखवून काही पैशांची अफरातफर केली आहे. त्याशिवाय या पुराव्यामधून असेही दिसले आहे, की या व्यावसायिकांनी पब्लिक लिमिटेड कंपनीचया खातेवह्यातही गडबड केली आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...