दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाला विजेतेपद

Date:

पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू  भालेकर करंडक निमंत्रित १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत ऋषी राऊत 73(153), शुभम खरात 28(83), कपिल देडगे नाबाद 44(47) यांनी केलेल्या धावांसह अभिजित सावळे(49-5), गौरव कुमार(40-3) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर केडन्स क्रिकेट अकादमी संघाने अनिर्णित सामन्यात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीविरुद्ध पहिल्या डावात 95 धावांची आघाडी मिळवत विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या अंतिम सामन्याच्या दोन दिवसीय लढतीत पहिल्या दिवशी काल व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व त्यांचा डाव 44.3षटकात 158धावांवर संपुष्टात आला. आज केडन्स संघाचा डाव 4बाद 109धावांपासून पुढे सुरु झाला. केडन्स संघाने 90षटकात 8बाद 253धावा करून पहिल्या डावात संघाला 95धावांची आघाडी मिळवून दिली. यामध्ये तेजस बांदल 14, गौरव कुमकर 27, प्रद्युम्न चव्हाण 25, ऋषी राऊत 73, शुभम खरात 28, कपिल देडगे नाबाद 44, अभिजित सावळे 25 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. व्हेरॉककडून रोहित चौधरी 33-97-3, सोहम जामले 34-62-4, हर्षवर्धन पवार 8-46-1 यांनी सुरेख गोलंदाजी केली.

दुसऱ्या डावात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा डाव 31.2षटकात 185धावावर संपुष्टात आला. यात यश जगदाळे 69, अद्वैत मुळ्ये 64, यज्ञेश मोरे 18, आदित्य एकशिंगे 17 यांनी धावा केल्या. केडन्सकडून अभिजित सावळे याने 49 धावात 5 गडी,तर गौरव कुमारने 40 धावात 3गडी, शुभम खरातने 38धावात 2 गडी बाद करून व्हेरॉक संघाला 185 धावांवर रोखले. पण केडन्स संघाने पहिल्या डावात आघाडी घेतल्यामुळे त्यांना 91धावा विजयासाठी आवश्यक होत्या. आज दिवस अखेर याच्या उत्तरात केडन्स संघाने तेजस बांदल 20धावा, प्रद्युम्न चव्हाण नाबाद 23 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर 12षटकात 1बाद 46धावा केल्या व त्यामुळे सामना अनिर्णित राहिला. या अनिर्णित सामन्यात केडन्स संघाने पहिल्या डावाच्या आघाडीच्या फरकावर व्हेरॉक विरुद्ध विजय मिळवला.

स्पर्धेतील विजेत्या केडन्स क्रिकेट अकादमी संघाला राजू भालेकर स्मृती करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ सुधीर भाटे, गोल्डफिल्ड प्रॉपर्टीजचे  अनिल छाजेड आणि टी.एन.सुंदर, एमसीएचे अध्यक्ष विकास काकतकर, एमसीएचे सचिव रियाज बागवान, क्लबचे मानद सचिव आनंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, रिजुता भालेकर, रणजित पांडे, रोहन छाजेड आणि कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
पहिला डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 44.3षटकात सर्वबाद 158धावा(अद्वैत मुळ्ये 49(75,5×4,4×6), श्रेयश केळकर 30(31,6×4), यश जगदाळे 23, यज्ञेश मोरे 16, हर्षवर्धन पवार नाबाद 12, यतीन एम 10-48-3, प्रसन्ना हजारे 14-47-3, शुभम खरात 3.3-23-2, गौरव कुमकर 5-21-2)वि.केडन्स क्रिकेट अकादमी: 90षटकात 8बाद 253धावा(तेजस बांदल 14, गौरव कुमकर 27(64,3×4), प्रद्युम्न चव्हाण 25(52,5×4), ऋषी राऊत 73(153), शुभम खरात 28(83), कपिल देडगे नाबाद 44(47), अभिजित सावळे 25(62), रोहित चौधरी 33-97-3, सोहम जामले 34-62-4, हर्षवर्धन पवार 8-46-1); केडन्स संघाकडे पहिल्या डावात 95धावांची आघाडी;

दुसरा डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 31.2षटकात सर्वबाद 185धावा(यश जगदाळे 69(45), अद्वैत मुळ्ये 64(69), यज्ञेश मोरे 18(25), आदित्य एकशिंगे 17(10), अभिजित सावळे 10-49-5, गौरव कुमार 6.2-40-3, शुभम खरात 7-38-2)पराभूत वि.केडन्स क्रिकेट अकादमी: 12षटकात 1बाद 46धावा(तेजस बांदल 20, प्रद्युम्न चव्हाण नाबाद 23(40), हर्षवर्धन पवार 4-16-1०)सामनावीर-ऋषी राऊत; सामना अनिर्णित; पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर केडन्स संघ विजयी.

इतर पारितोषिके:
सर्वोकृष्ट फलंदाज: यश जगदाळे;
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: गौरव कुमार
मालिकावीर: यतीन मंगवानी
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक: आदित्य लोंढे
यष्टीरक्षक: वरद कुलकर्णी

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...