शरण्या गवारे, सुदिप्ता कुमार, सिध्दांत बांठीया यांना एमएसएलटीए वार्षिक पुरस्कार प्रदान

Date:

मुंबन –सब-ज्युनियर राष्ट्रीय खेळाडू शरण्या गवारे, सुदिप्ता कुमार, सिध्दांत बांठीया,  मिनी-ज्युनियर राष्ट्रीय खेळाडू गार्गी पवार, मानस धामने, वैष्णवी आडकर यांना 2017-18 या वर्षातील एमएसएलटीए वार्षिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
या पुरस्कारांचे वितरण प्रविण दराडे, एमएसएलटीएचे आजीव अध्यक्ष शरद कन्नमवार, एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर , एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देशपांडे, एमएसएलटीएचे खजिनदार सुधीर भिवापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

राष्ट्रीय व राज्य स्तरावर अव्वल तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळविणाऱ्या आणि आपल्या देशासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हि शिष्यवृत्ती  प्रदान करण्यात येत असल्याचे  एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले. 
राज्यातील प्रत्येक गटातील अव्वल तीन खेळाडूंना 10 लाखांहून अधिक रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.  श्रीराम गोखले यांना  एमएसएलटीए सर्वोत्कृष्ट टेनिस ऑफिशियल म्हणून, तर  ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेसाठी बॉल कीड म्हणुन निवड झाल्याबद्दल जेनिका जयसन हीला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आलेतसेच, यावेळी हेमंत बेंद्रे, संदीप किर्तने, श्रीनिवास राव कोला, केदार शहा आणि आदित्य मडकेकर यांनी महाराष्ट्राला राष्ट्रीय विजेते व उपविजेते मिळवून दिल्या बद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या डेक्कन जिमखाना, नवी मुंबई स्पोर्टस असोसीएशन, सोलापुर जिल्हा लॉन टेनिस संघटना, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया(सीसीआय), डॉ. जी.ए रानडे टेनिस सेंटर मुंबई, नवनाथ शेटे स्पोर्टस् अकादमी यांचा गौरव करण्यात आला.      
शिष्यवृत्ती मिळालेल्या खेळाडूंची यादी- 
अर्जून कढे, आर्यन गोवीस, जयेश पुंगलिया, ऋतुजा भोसले, मिहीका यादव, आर्यन भाटीया, सिध्दांत बांठीया,  गुंजन जाधव, फैज नस्याम, अमन तेझाबवाला, अर्जुन गोहड, शिवम कदम, दक्ष अगरवाल, मानस धामने, अर्णव पापरकर, काहिर वारीक, आरव मेहता, अभय नागराजन, विवान कारंडे, शरण्या गवारे, सालसा आहेर, सुदिप्ता कुमार, प्रेरणा विचारे, हर्षाली मांडवकर, रिचा चौगुले, अनर्घ गांगुली, गार्गी पवार, वैष्णवी आडकर, राधिका महाजन, ऋतुजा चाफळकर, इरा शहा, कायरा चेतनानी, आस्मी अडकर, नैनीका रेड्डी, आकृती सोनकुसरा, रुपेश नलावडे
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चंद्रकांतदादांचा पाच महापालिकांमध्ये प्रचाराचा झंझावात

एकूण १०० पेक्षा जास्त बैठका, ५० चौक सभा, १०...

मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं आणि वर्तमानात पाहावं.…..

-भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबई- संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी जे...

मतदानाकरिता मतदानादिवशी सुट्टी-कामगार उपआयुक्त निखील वाळके

पुणे, दि. 13 : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५-२६ करीता मतदारांना...

मतदानासाठी भरपगारी सर्वांनाच सुट्टी

पुणे- महानगरपालिका सार्वत्रिक निडणूकीसाठी दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी...