पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

Date:

पुणे- पुणे महानगर पालिका यांच्या तर्फे व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 5 जानेवारी ते 20 जानेवारी 2019 या कालावधीत डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडणार आहे.
 
शहरातील 10 वर्षाखालील, 12 वर्षाखालील व 14 वर्षाखालील एकूण 350 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. अशी माहिती डेक्कन जिमखान्याचे टेनिस विभागाचे सचिव व स्पर्धा संचालक अश्विन गिरमे यांनी दिली. 
 
स्पर्धेतील प्रत्येक वयोगटीतील विजेत्या खेळाडूंना 15 हजार रुपये व करंडक तर उपविजेत्या खेळाडूंना 10 हजार रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. 
 
स्पर्धेचे उद्घाटन 5 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता पुणे महानगर पालिकेच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे करण्यात येणार आहे. यावेळी स्पर्धेचे संयोजक व स्थानिक नगरसेवक सिध्दार्थ शिरोळे उपस्थित असणार आहेत. 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त लाल महालात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पुष्पहार अर्पण; “लाडक्या बहिणींमागे जिजाऊंची प्रेरणा”

पुणे, दि.१२: स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील...

नियोजनबद्ध विकासासाठी काँग्रेस उमेदवार विजयी करा..! काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी

प्राथमिक आरोग्य व शिक्षण सुविधांसह,वहातुक कोंडी मुक्त ‘पुणे करू...

नामंवत सायकलपट्टूचे क्रीडा कौशल्य बघण्याची संधी गमावू नका-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्हाधिकाऱ्यांनी फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन पुणे, दि. १२: ‘बजाज...

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार: राघवेंद्र बाप्पू मानकर

पुणे: प्रभाग क्र २५ मधील ज्येष्ठांसाठी आपल्या प्रभागातच सुसज्ज...