वीज कंपन्यांचे ८३००० कर्मचारी संपावर ७ जानेवारीला देणार ७२ तासाचा झटका

Date:

नागपूर –राज्यातील तीनही वीज कंपन्या महावितरण, महापारेषण आणि मेहाजेनकोतील तब्बल ८३ हजार कर्मचाऱ्यांनी येत्या ७ जानेवारीपासून ७२ तास संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सबऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशन आणि वीज कामगार युनियन यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, ऊर्जा विभाग आणि व्यवस्थापनाला नोटीस दिली आहे. ‘इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्ट’मध्ये होत असलेल्या संशोधनाचा विरोध व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी संपाचा इशारा देण्यात आला आहे.

वर्कर्स फेडरेशनद्वारा प्रकाशित पत्रकात म्हटले आहे की, तीन कंपन्यांचे कर्मचारी गेल्या चार वर्षांपासून सरकारसोबत आपल्या विविध मागण्यांबाबत चर्चा करीत आहेत. परंतु अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कामगार संघटनांनी ६ व ७ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपासून एक दिवसाच्या संपाची घोषणा केली होती. त्यात आता ८ आणि ९ तारखेलाही जोडण्यात आले आहे. संघटनांच्या इतर मागण्यांमध्ये महावितरणची पुनर्रचनेबाबत त्यांनी दिलेल्या सूचनांवर अंमलबजावणी व्हावी, महापारेषणमध्ये मंजूर पद कमी करण्यात येऊ नयेत, फ्रेन्चाइसीवर रोख लावत मुंब्रा, शील, कळवा व मालेगाव येथे फ्रेन्चाइसीबाबत सुरू असलेली प्रक्रिया थांबवण्यात यावी, महाजेनकोचे लघु जलविद्युत प्रकल्प अधिग्रहित न करणे आणि महाजेनकोचे २१० मेगावॅट क्षमतेचे युनीट बंद करण्यात येऊ नयेत आदी मागण्यांचा समावेश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

निवडणुकीत लाडक्या बहिणी सूत्रधाराची भूमिका बजावणार

पुणे.दि.१४: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या (१५...

“राणी मुखर्जीच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीला अनिल कपूरचा सलाम”

बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांनी त्यांची सहकलाकार आणि जवळची...

अभय योजनेचा शेवटचा दिवस: मतदानामुळे ऑनलाईन भरणा करण्याचे प्रशासनाचे आवाहन 

पुणे- मिळकत कर विभागाच्या अभय योजनेचा उद्या शेवटचा दिवस आहे....