पुणे- ऋषीपंचमी निमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आज (मंगळवारी) २१ हजार महिलांनी अथर्वशीर्षाचं पठण केले. अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण गेल्या 29 वर्षांपासून दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर करण्यात येते.
या अथर्वशीर्ष पठणावेळी शिवसेनेच्या नेत्या आमदार निलम गोऱ्हे तसेच पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला उपस्थित होत्या.