पुणे– भगवान महावीर विकलांग सहायता समिती आणि पर्सिस्टंट फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग जणांसाठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात कृत्रिम अवयव, क्लीपर्स मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ज्या दिव्यांग व्यक्तींना जयपूर फूटची आवश्यकता असेल त्यांना जागेवरच आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करुन जयपूर फूट दिले जातील. शिबीरामध्ये सहभागी होण्यासाठी कोणतीही फी नसून अधिकाधिक व्यक्तींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यातील सारस बागेसमोरील जैन मंदिरामध्ये हे शिबीर बुधवार दिनांक 20 डिसेंबर ते 22 डिसेंबर असे तीन दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. ज्या दिव्यांगांना जयपूर फूटची आवश्यकता असेल त्यांचे मोपमाप घेऊन, जागेवरच त्याची चाचणी घेऊन जयपूर फूट तयार करुन वाटप केले जाईल, अशी माहिती आयोजकांनी दिली. ( 9822086485 योगिता आपटे/8605015104 ऋषिकेश )