‘काही लोकांना मंदिर बांधून कोरोना जाईल, असे वाटते’, राम मंदिर भूमिपूजनावरुन शरद पवारांचा पंतप्रधानांना मोदींना टोला

Date:

सोलापूर -श्री राम जन्मभूमी अयोध्येत राम मंदिराचे काम ऑगस्टमध्ये सुरू होत आहे. यासाठी येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपुजन पार पडणार आहे. या भूमिपूजनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ‘कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचे, हे आधी ठरवायला हवे. आम्हाला कोरोना संपवला पाहिजे असे वाटते आणि काही लोकांना मंदिर बांधून कोरोना जाईल, असे वाटते’, असा पवारांनी लावला आहे. पवार आज सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हेदेखील उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, ‘सध्या देशासमोर करोनाचे संकट उभे ठाकले आहे. त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित आले पाहिजे. एकमेकांशी समन्वय साधून काम झाले पाहिजे. करोनाचे भयसंकट परतवून लावण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे आधी ठरविले पाहिजे. परंतू, मंदिर बांधून करोनाचे संकट दूर होईल, असे काही मंडळींना वाटतं आहे. राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा. फक्त करोनाचं संकट दूर व्हावं हीच आमची इच्छा आहे,’ असा टोला पवारांनी नरेंद्र मोदींना लगावला. 

पवार पुढे म्हणाले की, ‘कोरोनामुळे नागरिकांना अनेक गोष्टींचा आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातून लोकांना कसे बाहेर काढायचे, याबाबत आम्ही विचार करत आहोत, त्याला आम्ही प्राधान्य देत आहेत. काही लोकांना वाटत असेल मंदिर बांधून कोरोना जाईल. त्यामुळे राममंदिर बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला असावा. राज्य आणि केंद्र सरकारने कोरोना संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या परिस्थितील लोकांना मदत करण्यास प्राधन्य दिले पाहिजे. याबाबत आमचे खासदार दिल्लीत प्रश्न मांडतील’, असेही पवारांनी म्हटले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. सलील कुलकर्णी यांचा पहिल्या संगीतकार यशवंत देव पुरस्काराने गौरव

संगीत ही आराधना; जीवनातील अखंड काव्य : प्रकाश जावडेकर पुणे...

पुणेकरांना अपेक्षित असाच गणेशोत्सव करू : मुरलीधर मोहोळ

गणेशोत्सव हा पुणेकरांचा लोकोत्सव; लोकसहभाग अधिक व्यापक करण्याची ग्वाही ‘गणेशोत्सव...

IIT Bombay मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई काँग्रेसचे तीव्र आंदोलन.

IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा,...

मिरवणुकीचा खर्च टाळला; गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला निधी

शिवाजीनगर गावठाणातील श्री सद्गुरु मित्र मंडळाचा आदर्श गणेशोत्सव; उर्वरित...