पुणे – या परिसरात नागरी सुविधा देताना विकासाचा समतोल राखला जाईल. तसेच विकासाची फळं समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यात येतील. नागरी सुविधांबरोबरच या परिसरात रहाण्यासाठी आणि मुलांवर चांगले संस्कार होतील असे खेळीमेळीचे वातावऱण तयार करण्यावरही भर देऊ असे सनी उर्फ चंद्रशेखर विनायक निम्हण यांनी आज येथे सांगितले.
पाषाण – सोमेश्वरवाडी- सुतारवाडी- बाणेर – बालेवाडी- पंचवटी प्रभाग क्रमांक ९ मधील शिवसेनेचे उमेदवार सनी उर्फ चंद्रशेखर विनायक निम्हण, संजय निम्हण, रोहिणी धनकुडे आणि नीता रणपिसे यांनी विठ्ठलनगर परिसरातील मतदारांशी संपर्क साधून त्यांच्या भावना समजून घेतल्या. शिवसेना…शिवसेना या गाण्याने निर्माण होणा-या उत्साही वातारवणात, कड़ाडणा-या हलगीचा, ताशाचा आवाज आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त घोषणाबाजी वातावरणात प्रचार फेरी सुरू झाली. विठ्ठलनगरमधून प्रचार फेरी सुरू झाली.
भगवती नगर, शिवनगर, नलावडे वस्ती आणि या परिसरातील विनोद रेसिडेन्सी, भगवती सोसायटी सारख्या मोजक्या सोसायट्यातील मतदारांशी उमेदवारांनी प्रत्यक्ष संपर्क साधला.
ज्येष्ठ आबालवृद्धांच्या पाया पडून त्यांचे आर्शिवाद उमेदवार घेत होते आणि नागरीक उमेदवारांना शुभेच्छा देत होते. या प्रचार फेरीत शामराव रणपिसे, वाडेश्वर सुतार, रेखा सुतार, अमीत रणपिसे, मुन्ना निम्हण यांच्यासह अनेक तरूण व महिला कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, काल संध्याकाळी पाषाण परिसारातील एआरडीई कॉलनीत सनी उर्फ चंद्रशेखर विनायक निम्हण यांच्यासह सर्व उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधला. संस्थेचे संचालकरामराजन यांच्यासह त्यांच्या वरिष्ठ अधिका-यांनी उमेदवारांचे स्वागत केले. . त्यामुळे अधिका-यांनी उमेदवारांशी काही वेळ चर्चाही केली. या प्रचार फेरीत एआरडीई तील कर्मचारीवर्ग सहभागी झाला