रॅलीद्वारे नागरिकांना दिला स्वच्छतेचा संदेश
पुणे:
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ च्रा एम. ए. रंगुनवाला महाविद्यालयाच्या वतीने पुणे स्टेशन परिसरामध्ये नुकतीच ‘स्वच्छता मोहीम’ आयोजित करण्यात आली होती.मोहिमेतंर्गत विद्यार्थ्यांनी पोस्टर्स, बॅनर्सच्या माध्यमातून स्वच्छता विषयक जनजागृती करणारी रॅली काढली होती. रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी नागरिकांना स्वच्छतेविषयी संदेश दिला.
स्वच्छ भारत अभियानातंर्गत आयोजित मोहिमेस पुणे महानगरपालिका सहायक आयुक्त संजय गावडे, ढोले-पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय येथील विभागी आरोग्य निरीक्षक राजेंद्र बहिरट, आरोग्य निरीक्षक मधुकर पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता फ्रान्झ, प्रा.नितीन शिंदे आणि पुनीत बासन यांचे उत्तम सहकार्य लाभले. तसेच या मोहिमेस विद्यार्थी आणि शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
ससून रुग्णालयासमोरील आंबेडकर पुतळ्यापासून या मोहिमेस सुरुवात झाली. या मोहिमेचे संयोजन प्रा.नितीन शिंदे व पुनीत बासन यांनी केले होते.
मोहिमेतंर्गत विद्यार्थ्यांनी पुणे स्टेशन येथील परिसर झाडून तेथील सर्व कचरा साफ केला. स्टेशन बस डेपो येथे मोहिमेची सांगता झाली.
‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व वाढावे तसेच पुणे शहराला ‘स्मार्ट सिटी’ होण्यास मदत व्हावी, या प्रमुख हेतूने ही स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती’, असे प्रा. अनिता फ्रान्झ यांनी सांगितले.