प्रकाश आंबेडकर यांची ब्रेन मॅपिंग चाचणी करा – भिडे गुरुजींच्या समर्थकांची मागणी

Date:

पुणे-संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी नेमके काय म्हटले आहे,

1)गेले दोन महिने भीमा कोरेगाव प्रकरणामुळे राज्यातील वातावरण दुषित झाले. यात संभाजी भिडे गुरुजी यांचे नाव गोवण्यात आले. मात्र, या प्रकरणाशी भिडे गुरुजींचा दुरान्वयाने देखील संबंध नाही.

2)१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगावमधील वातावरण ज्या वादग्रस्त फलकावरुन बिघडले ते फलक लावणाऱ्यांना तत्काळ अटक करावी आणि त्यांची चौकशी करावी.

3)३१ डिसेंबर रोजी पुण्यातील शनिवारवाड्यातील प्रांगणात एल्गार परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेत जातीय तेढ निर्माण करणारी पत्रके वाटण्यात आली. याशिवाय मंचावर चिथावणी देणारी भाषणे झाली. जिग्नेश मेवाणी, उमर खलिद आणि माजी न्या. बी. जी. कोळसे यांनी भाषणे केली. याच लोकांनी पूर्वनियोजित कट करुन ही दंगल घडवून आणली.

4)३ जानेवारी २०१८ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, हा बंद शांततामय रितीने पाळला गेला नाही. या दिवशी झालेल्या हिंसाचारात मालमत्तेचे नुकसान झाले. ही नुकसान भरपाई सरकार देणार आहे. मात्र, सरकारने नुकसान भरपाई देण्याऐवजी ज्यांनी नुकसान केले त्यांच्याकडून वसूली करावी. हा बंद पुकारणाऱ्या प्रकाश आंबेडकर आणि संबंधित मंडळींकडून नुकसानीची भरपाई वसूल करावी.

5)भीमा कोरेगावात राहुल फटांगडे या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील गुन्हेगारांना अद्याप अटक झालेली नाही. त्यांना देखील तत्काळ अटक करावी.

6)पुण्यात एल्गार परिषदेत नक्षलवादी संघटनांचा सहभाग होता, असे पोलीस तपासात समोर आले होते. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा खुलासा करावा.

7)प्रकाश आंबेडकर यांची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात यावी.

८)संभाजी भिडे गुरुजी गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्या परिसरात गेलेले नाही. पण तरी देखील प्रकाश आंबेडकर यांनी भिडे गुरुजींचे नाव या प्रकरणात घेतले आहे. त्यांना ही कोणी दिली, याची देखील चौकशी व्हावी.

९)भीमा कोरेगाव प्रकरणात तक्रार देणाऱ्या महिलेने संभाजी भिडे यांना बघितल्याचा उल्लेख केला होता. मात्र, पोलीस चौकशीत अजूनही संभाजी भिडेंविरोधात कोणताही पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे या महिलेला ताब्यात घेऊन तिची पोलीस चौकशी करावी.

१०)भिडे गुरुजी व एकबोटेंवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.