डिस्ट्रीक्ट ३१३१’चे अभय गाडगीळ, सतीश खाडे यांनी सर्वांचा सत्कार केला.
‘विकास हा विकेंद्रित असावा’ : ‘हवामानाशी निगडित पाणी वापर होणे आवश्यक’: डॉ . दि. मा. मोरे
पुणे :
‘विकास हा विकेंद्रित असावा. एकीकडे शेतीची उत्पादकता वाढत नाही तर, दुसरीकडे पावसाच्या लहरीपणामध्ये सातत्याने बदल होत आहे. हवामानाशी निगडित पाणी वापर होणे आवश्यक आहे. पाणी साठविता येत नसल्यामुळे दुष्काळाच्या स्थितीला सामोरे जावे लागते. विकास म्हणजे संपत्ती आणि रोजगार निर्मिती ही उद्दिष्टे साध्य झाली. पण, पिण्यासाठी पाणी नाही त्याच क्षेत्रात जास्त पाणी लागणारे पीक घेतले जात आहे, हे बदलले पाहिजे. विकास आणि पाणी ही संसाधने आहेत, अशा परिस्थितीमध्ये पाणी वापरणाऱ्या सर्वांना बदलावे लागेल, असे मत पाटबंधारे विभागाचे निवृत्त सचिव डॉ. दि. मा. मोरे यांनी बुधवारी झालेल्या रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट ३१३१ च्या ‘जलोत्सव २०१७’ च्या सहाव्या पुष्पात मांडले.
रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट ३१३१ च्या ‘रोटरी जलोत्सव २०१७ ‘मध्ये ते ‘पाणी आणि विकास’ या विषयावर बोलत होते.
मोरे म्हणाले, ‘विकास हा तंत्रज्ञानावर आधारित पाहिजे. पाणी हे जीवन आहे. पाण्याला एक मर्यादा आहे. अनुकूलता जेथे असते तेथे विकास होतो. कमीत कमी संसाधनातून जास्तीत जास्त पीक घेणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात उद्योगाचे जाळे निर्माण केले पाहिजे.
जिल्ह्यातील शहरांना व उद्योगांना भविष्यात नेमके किती पाणी द्यायचे, याचा निर्णय शासनाला घ्यावा लागणार आहे. सांडपाण्यावर पुन्हा प्रक्रिया करून त्याचा वापर शेती साठी करता येऊ शकतो.’
यावेळी डॉ. बाळकृष्ण दिवेकर (फेरोसिमेंट बंधारे), प्रदीप आपटे (गोखले इन्स्टिटयूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स), केदार कुलकर्णी (‘ऋतु बायो सिस्टिम्स’ चे व्यवसाय विकास कार्यकारी), सुनील जोशी (जल बिरादरी ) यांनी पाणी बचत या विषयी सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले.
जलोत्सवाचे संयोजक सतीश खाडे यांनी प्रास्ताविक केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली पेंडसे यांनी केले.
यावेळी ‘जल बिरादरी’ या पाणी बचत विषयी जनजागृती करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचा गौरव करण्यात आला. तसेच ‘रोटरी क्लब ऑफ गांधीभवन’, ‘रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो’, ‘रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोड’ यांचा सत्कार करण्यात आला. ‘रोटरी क्लब
‘जल बिरादरी’चे सुनील जोशी यांनी उपस्थितांना पाणी बचतीची शपथ दिली.
प्रदीप आपटे यांनी पाणी, विकास आणि अर्थशास्त्र या विषयी माहिती दिली. डॉ. बाळकृष्ण दिवेकर यांनी फेरोसिमेंट पद्धतीने बांधकाम करण्याची पद्धत आणि पाणी बचत तसेच निरनिराळ्या पद्धतीमध्ये परिवर्तन करून पाणी बचत केले पाहिजे, यावर मार्गदर्शन केले. केदार कुलकर्णी यांनी पाणी संवर्धन आणि पाण्याची बचत यामध्ये ‘ऋतु बायो सिस्टम’चे कार्य या बाबत माहिती दिली.