Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुढच्या पिढीला चांगल्या संस्कारांची शिदोरी द्या – मुनीश्री पुलक सागर महाराज

Date:

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुनिश्रींचे घेतले आशीर्वाद

पुणे-” संत आणि सामान्य व्यक्ती दोघेही वसीहत लिहतात. सर्वसामान्य माणूस भौतिक संपत्ती त्या मृत्युपत्रात लिहितात. तर संत आपल्या मृत्युपत्रात जीवनाच्या उत्थनाचे मार्ग लिहीत असतो. महावीर भगवानांनी दिगंबर मुनींना एक पिछ्छी, कमंडलू आणि शास्त्र या तीन संपदा आपल्या मृत्युपत्रात दिल्या आहेत. गेली २६०० वर्षे दिगंबर मुनी त्या संपत्तीचे केवळ जतनच करत नाहीत, तर त्यात वृदधीदेखील करत आहेत. महावीरांनी श्रावकालादेखील लोटा, दोरी आणि चाळणी या तीन संपदा दिल्या आहेत. परंतु आजचे श्रावक या संपदाचे महत्व गमावून बसले आहेत. जैन मुनी आजही धर्माचे पालन करतात. मात्र श्रावक किती टक्के धर्माचे पालन करतात? मुनींच्या २८ गुणांकडे पाहणाऱ्यांनो महावीरांनी तुम्हालाही गुणांचे पालन करायला सांगितले आहे, त्याचे तुम्ही पालन करता का? भगवानांनी जो वारसा आपल्याला दिला आहे, तो आपण योग्यप्रकारे जपत आहोत का ? याचा विचार श्रावकांनी करावा,” असा उपदेश मुनिश्री प. पु. १०८ पुलकसागर महाराज यांनी आज दिला.
मुनिश्री प.पू. १०८ पुलकसागर महाराज यांचा चार्तुमास पुण्यातील धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी महालक्ष्मी लॉन्स येथे चालू आहे. सकल जैन वर्षायोग समितीतर्फे येथे चातुर्मासानिमित्त आयोजित ज्ञानगंगा महोत्सवातील वीसाव्या पुष्पात मुनिश्री वसीहतनाम या विषयावर बोलत होते. याप्रसंगी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, उपाध्यक्ष अजित पाटील, सुजाता शहा, वीरकुमार शहा, उत्कर्ष गांधी, हे व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी आयटी क्षेत्रातील उद्योजक व मार्गदर्शक दीपक शिकारपूर, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी यांनी मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले व प्रवचनाचा लाभ घेतला.मुनिश्रीनी त्यांना पुस्तके भेट दिली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुनिश्रीना आवर्जुन भेटून श्रीफळ अर्पण केले व आशीर्वाद घेतले.मुनिश्रीनी त्यांना पुस्तके भेट दिली.समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल कार्याध्यक्ष मिलिंद फडे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड अभय छाजेड,जितेंद्र शहा,उत्कर्ष गांधी उपस्थित होते. याप्रसंगी अशोक चव्हाण यांनी मुनिश्रीना सांगितले कि समाजात सध्या अस्थिरता वाढत आहे असहिष्णुता वाढत आहे समाजाच्या दृष्टीने ही चांगली बाब नाही.यासाठी आम्ही संघर्ष यात्रा काढत आहोत असे ते म्हणाले.याप्रसंगी मुनीश्री म्हणाले कि समाजात अस्थिरता असहिष्णुता वाढत आहे ही निश्चितच चिंतेची बाब आहे.मात्र असहिष्णुता व दहशतवाद यांच्या मूळ कारणाशी आपण गेले पाहिजे आणि त्यासाठीच अहिंसा परस्परसहयोग व सहिष्णुता समाजात विशेषतः तरुणांमध्ये रुजण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले पाहिजेत.

आजच्या कार्यक्रमाच्या सुरवातीस दीपा गांधी आणि परिवार यांच्या हस्ते कलशस्थापना, पादप्रक्षालन अणि शास्त्रभेटीचे विधी संपन्न झाले. त्यानंतर गुलटेकडी येथील गंगागीतांजली ग्रुपतर्फे मंगलाचरण सादर करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल यांच्याहस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
मुनिश्री पुढे म्हणाले,”” प्रत्येक व्यक्तीने आपले स्वत:चे वारसापत्र तयार करावे. या वारसापत्रात मुलांना जर काही द्यायचेच असेल, तर चांगले संस्कार, पवित्र आचरणांची शिदोरी द्यावी. जगाच्या नजरेत आदर्श बना अथवा नका बनू, पण आपल्या मुलांच्या नजरेत तुम्ही आदर्श बना यातूनच तुमच्या आयुष्याचे सार्थक होईल.” असे ते म्हणाले.

याप्रसंगी आयटी क्षेत्रातील उद्योजक व मार्गदर्शक दीपक शिकारपूर म्हणाले,”” संगणकाच्या युगात पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे, सायबर क्राइमच्या विळख्यात अडकणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मोबाईल डिसॉर्डरदेखील वाढले आहे. भारताचा शत्रू पाकिस्तान नाही आता तो व्हॉटस अप आहे. तंत्रद्यानाचा वापर उपयोगासाठी केला पाहिजे, मात्र लोक आता त्याबाबत व्यसनाधीन झाले आहेत.” अशावेळी मुनिश्रीनी केलेले समाजप्रबोधन खूप महत्वाचे आहे असे ते म्हणाले.

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी म्हणाले,”” मौखिक परंपरा असो की सनातन परंपरा या परंपरेचा मूळ उद्देश नागरिकांचे जीवन सुखी करणे हाच आहे. आजचा समाज या परंपरेपासून दुरावल्यामुळे तो असंतोषात जगत आहे. या अंसतोषापासून मुक्ती मिळावी, यासाठी नागरिकांनी परंपरेचा अवलंब करावा.” यावेळी गोविंदराव कुलकर्णी यांनी सर्वधर्मीय संतांच्या चर्चासत्रासाठी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ सहकार्य करणार असल्याचे घोषित केले.
या प्रवचन प्रसंगी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.उपाध्यक्ष अजित पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

आर एम धारिवाल फौंडेशनतर्फे दि.१२ऑगस्टपासून मंडपस्थळी रक्तदान शिबीर चालू असून त्यासाठी आर.एम धारिवाल फौंडेशनतर्फे अत्याधुनिक बस उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...