Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कोथरूडनंतर कँन्टोमेंट विधानसभेच्या मोहऱ्यावर पोलिसी संक्रांत ?

Date:

पुणे- गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत गोंधळ घातल्याबद्दल आणि मारहाण केल्याबद्दलच नव्हे तर गणेशमूर्ती विटंबनाचाही आरोप ठेवून  काल सकाळी  कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना खडक पोलिसांनी अटक केली.आणि या बातमीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली …’आता  मानकरांनंतर – बागवे …. काय ? असा सवाल उपस्थित करत अनेकांनी धसका घ्यायला सुरुवात केली  आहे. माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाची अशी अवस्था होत असेल तर आम्हाला तर देशोधडीला लावतील असा सूर कॉंग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये उमटलेला आज दिसला .

अविनाश बागवेसारखा नगरसेवक   गणेश मूर्तीची विटंबना  करेल  यावर कोणीही विश्वास ठेवताना दिसत तर  नाहीच आणि  त्यांच्या स्वभावाची माहिती असणारे, ते कधी गुंडा गर्दी करतील, यावरही विश्वास ठेवायला तयार नाहीत . यातील जे काही असेल ते ,खरे खोटे फार  काळ लपून मात्र निश्चित रहाणार नाही .मात्र या घटनेने कोथरूड विधानसभेच्या राष्ट्रवादीच्या मानकर या मुख्य मोहऱ्यानंतर कँन्टोमेंट विधान सभेच्या कॉंग्रेस च्या मुख्य मोहऱ्याला दणका दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे.

विशेष म्हणजे हा प्रकार झाला तो अविनाश बागवे यांच्या कार्यालयासमोरच…  भाजपच्या नगरसेविकेचा थेट संबध असलेल्या मंडळाने या ठिकाणी आपली मिरवणूक नेली .आणि डीजेडॉल्बीला, उच्च न्यायालयाने बंदी घातलेली असताना , सत्ताधारी भाजपचा देखील विरोध असताना ,पालकमंत्र्यांचा ही विरोध असताना येथे साऊंडच्या मोठ्ठ्या आवाजात ..पाटील आला ..पाटील आला … या गाण्यावर बराच काळ येथे कार्यालयात उपस्थित असलेल्या अविनाश बागवे यांना टस्सल देण्याचा प्रयत्न केला .हे स्पष्ट दिसते आहे .अविनाश बागवेंचे पाटील हे राजकीय विरोधक आहेत. पण अशा प्रकारे गणपती विसर्जन मिरवणुकीचा उपयोग राजकीय वैमनस्यासाठी करणे हे रुचणारे नाही . 

माजी गृहराज्यमंत्री असलेले ,पुणे शहर काॅंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांचे अविनाश हे चिंरजीव आहेत. विसर्जन मिरवणुकीत काल सायंकाळी कासेवाडी येथे असलेल्या बागवे यांच्या राजीव गांधी पतसंस्थेसमोरच हा प्रकार  घडला.

मिरवणुकीदरम्यान  मंडळाचा गणपती विसर्जनासाठी जात होता. मिरवणुकीतील ट्रॅक्टरचा चालक आणि साऊंड सिस्टिमचा मालक यांना मारहाण करण्याच्या सूचना आणि चिथावणी अविनाश बागवे यांनी दिल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले  आहे. तेव्हा बागवे यांच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरचालक  आणि अन्य एकाला मारहाण केली. साऊंड सिस्टिमची यात मोडतोड झाली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत अडथळा निर्माण झाला. चप्पल, शूज, दगड हे मिरवणुकीच्या दिशेने फेकले गेले आणि  गणेशमूर्तीची विटंबना केली गेल्याने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.असे पोलिसांचे म्हणणे आहे .

अविनाश बागवे यांच्यासह यासीर बागवे, बंटी बागवे, दयानंद अडागळे, जयवंत मोहिते, सूरज कांबळे, कुमार अडागळे, नितीन कसबे, बापू कसबे, गणेश जाधव, अरूण गायकवाड, सुरेखा खंडागळे, विठ्ठल थोरात, परेश गुरव, सूरज कांबळे, शिवाजी कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

यातील यासिर तर आणि बंटी दोघे बागवेंच्या नातेसंबधातील आहेत.इतर बागवेंच्या कार्यालयात कायम दिसणारे कार्यकर्ते आहेत .

गेल्या आठवड्यातच रमेश बागवे यांचे कट्टर समर्थक असलेले महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते ,नगरसेवक अरविंद शिंदे यांनी महापालिकेच्या मुख्य सभेत … दीपक मानकरांना मोक्का लावल्याबद्दल शासनाच्या भूमिकेवर संशय घेणारे जाहीर वक्तव्य केले होते . 17 पैकी 16 गुन्ह्यात जी व्यक्ती निर्दोष सुटलेली आहे .अशा व्यक्तीवर मोका कसा लागतो…? असा प्रश्न उपस्थित करत राजकीय विरोधक अशा मार्गाने संपविणे हा प्रकार लोकशाहीला घटक असल्याचे म्हटले होते.

दीपक मानकर आणि रमेश बागवे हि दोन्ही नावे  पुण्याच्या  राजकारणातील भारदस्त नावे मानली जातात .यातील मानकर हे राष्ट्रवादीत तर बागवे हे कॉंग्रेस मध्ये आहेत .बागवे  मातंग समाजाचे आणि मानकर मराठा समाजाचे नेते म्हणूनही परिचित आहेत .तत्कालीन खासदार सुरेश कलमाडींचे हे दोघे कधी काळी दोन हात होते .तुरुंगात खितपत पडलेल्या राष्ट्रवादी चे नेते छगन भुजबळ यांची एकीकडे  जामिनावर सुटका झाली आणि दुसरीकडे काही दिवसातच पुण्यातील  मानकर कारागृहात गेले .दोन्ही घटनांचा प्रत्यक्षात संबध नसला तरी ते दोघे हि एकाच पक्षाचे एवढे तरी साम्य आहे.

सध्या महापालिकेत ,राज्यात ,आणि केंद्रात भाजपची एक हाथी सत्ता आहे. या पार्श्वभूमीवर हि सारी चर्चा घडते आहे . आणि मानकरांनंतर आता बागवे काय ? असा सवाल उपस्थित केला जातोय .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लवकरच जाहीर होणार गट क लिपिक व टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल

https://www.youtube.com/live/fFVATRwAxP4?si=7g1Z8-YHQWZYClCS एमपीएससीच्या कारभारावर आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत लक्षवेधी मुंबई/ पुणे...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन शिक्षेत वाढ:सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या विधेयकाचे झाले काय?

दारूबंदी सुधारणा विधेयक 2025 घेतले मागे... मुंबई-सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून...

दारुबंदी विधेयक सुधारणेसाठी सभागृहात आमदार महेश लांडगे यांनी मांडली आक्रमक भूमिका

कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांचे सर्वंकष उपाययोजनांचे निर्देश मुंबई/ पिंपरी-चिंचवड...

चाकूर च्या माजी नगराध्यक्षांसह शरद पवार गट, ‘प्रहार’ च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत मुंबई, 11 जुलै...